google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा बँक शाखा घेरडी " आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय , ७ आरोपींना शिक्षा . तब्बल २ कोटी १० लाख ७० हजार २२१ रूपयांचा केला होता घोटाळा

Breaking News

सोलापूर जिल्हा बँक शाखा घेरडी " आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय , ७ आरोपींना शिक्षा . तब्बल २ कोटी १० लाख ७० हजार २२१ रूपयांचा केला होता घोटाळा

 जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा घेरडी, ता.सांगोला येथे र.रु. २ कोटी १० लाख ७० हजार २२१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणीआराेपीना ३ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १००००/- रकमेचा दंड ठोठावण्यात आला.

सांगोला दिनांक १९/०५/२०२२

सांगोला पोलीस ठाणे सांगोला  येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सांगोला येथे आज चाललेल्या केसची माहिती

 1) आराेपींची नावे - १. आनंदा रामचंद्र उतरे , २. सदाशिव बापू आलदर, ३. शंकर भगवान गावडे, ४. सुर्यकांत दिनकर कुलकर्णी, ५. शिवाजी मनोहर गुन्हे, ६. सुभाष नाना करे, ७. साहूबा जायाप्पा गावडे, रा. घेरडी, ता.सांगोला जि.सोलापूर हे सर्व सन २०१७ पासून न्यायालयीन कोठडीत होते. 


खटल्यामध्ये ए.पी.पी. एस.आर.महाडीक यांनी केलेला युक्तीवाद ,तपासिक अंमलदार यांनी दिलेल्या साक्षींवरून आणि न्यायालयीन पैरवी यानी सदर खटल्यामध्ये वेळोवेळी केलेल्या पाठपूरावामुळे सदर खटल्यातील सर्व आरोपी यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा घेरडी, ता.सांगोला 

येथे र.रु. २ कोटी १० लाख ७० हजार २२१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मा. न्यायालयाने सर्व आरोपीनां दोषी धरुन आज दिनांक १९/०५/२०२२ राेजी सदर आराेपीना ३ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १००००/- रकमेचा दंड ठोठावण्यात आला.                                                               सदरची खटला हा स्टार खटला होता 

Post a Comment

0 Comments