अजित पवारांचे 12 आमदारांच्या विषयावर मोठे विधान ;" ज्यावेळी राज्यपालांना भेटतो, त्यावेळी ते म्हणतात......" पहा काय म्हणाले अजित पवार
"सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सगळ ठीक चाललंय ना ?"
हरगुडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रवींद्र ताकवले ,उपाध्यक्षपदी निलेश ताकवले यांची बिनविरोध निवड
पुणे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून प्रशासक?
12 आमदारांच्या निमित्ताने मी विचार करतो आहे असं राज्यपाल सांगतात. मात्र, ज्यावेळी आम्ही त्यांना भेटतो त्यावेळी ते केवळ 'करेंगे अजितजी करेंगे' असं म्हणतात असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्याचबरोबर राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या बातम्या सर्वांनी पाहिल्या आहेत.
आता त्या दोघांची याबाबात काय चर्चा झाली याची अद्याप तरी माहिती समोर आलेली नसल्याचे अजित पवार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रात निर्णय लागू होऊ शकतो का? यासाठी आम्ही माहिती घेत आहोत. विधी व न्याय खात्यासोबत देखील आम्ही चर्चा करत असल्याचे अजित पवार म्हणाले. जर आपल्याकडे देखील मध्य प्रदेश सरकारसारखा निकाल लागला असता तर सर्वचजण म्हणाले असते आमच्यामुळे झाले.
आता आपल्या राज्याबाबत जो निर्णय दिला तो त्यांचा अधिकार असणार आहे. राज्यात 50 टक्क्यांची अट न ओलांडता आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.


0 Comments