google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता आपोआप बनणार मतदान ओळखपत्र

Breaking News

आता आपोआप बनणार मतदान ओळखपत्र

 आता आपोआप बनणार मतदान ओळखपत्र 

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणनेत मोठे बदल जाहीर केले आहेत . अमिनगाव येथील जनगणना कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जनगणना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली . गृहमंत्री अमित शहा यांच्यानुसार , अधिक सोपी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यानुसार पुढील जनगणना 100 टक्के ई जनगणना असेल . ते म्हणाले की , मुलाच्या जन्मानंतर सर्व तपशील जनगणना नोंदवहीमध्ये जोडले जातील यामुळे वयाच्या 18 व्या वर्षी नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल . तसेच मृत्यूनंतर नाव काढून टाकले जाईल . या नवीन प्रणालीमुळे नाव / पत्ता बदलणे अधिक सोपे होणार सांगितले असल्याचे त्यांनी


शहा पुढे म्हणाले , जन्म - मृत्यू रजिस्टर जनगणनेशी जोडले जाईल . यानंतर 2024 पर्यंत प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद जनगणना रजिस्टरमध्ये केली जाईल . असे केल्याने आपोआप जनगणना अपडेट होत राहील . त्यांनी दावा केला आहे कि , यामुळे पुढील ई - जनगणना येणाऱ्या Voter ID card २५ वर्षांच्या धोरणांना आकार देईल . यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून जेव्हा हे सॉफ्टवेअर सुरू होईल तेव्हा सर्व तपशील ऑनलाइन भरणारे माझे कुटुंब पहिले असेल . दरम्यान जनगणनेचे महत्त्व सांगताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की , जनगणना ही धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते

Post a Comment

0 Comments