google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना येतोय महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान

Breaking News

कोरोना येतोय महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान

कोरोना येतोय


महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान

करोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. करोनाची चौथी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.


“जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments