google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झोपलेल्या युवकावरच चढविला ‘हायवा’; २७ वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू!

Breaking News

झोपलेल्या युवकावरच चढविला ‘हायवा’; २७ वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू!

 झोपलेल्या युवकावरच चढविला ‘हायवा’; २७ वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू!

पुणे : वीटभट्टीसाठी लागणाऱ्या माती खेपाची घाई भिगवणमधील तरुणाच्या जीवावर बेतली असता यामध्ये तरुणाचा दबून जागीच मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास घाईघाईने मातीची खेप खाली करायला आलेल्या हायवा चालकाने मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या युवकाच्या अंगावरच हायवा घातला , तसेच,पूर्ण मातीचा टिपर त्याच्या अंगावर रिकामा केल्याने भिगवणच्या ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे (वय २७) या युवकाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.दरम्यान, सदरची घटना बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिगवण (ता. इंदापुर) येथे घडली.दरम्यान, सदरची घटना बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिगवण (ता. इंदापुर) येथे घडली.

Post a Comment

0 Comments