google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी...

Breaking News

सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी...

 सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी... 

छोटा टेम्पो आणि व्हॅगनर गाडीची  समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

सांगलीतील कृष्णा नदीवर  असलेल्या आयर्विन पुलावर हा अपघात  झाला.


सांगली – सांगली शहरात भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर हा अपघात घडला   आहे. छोटा टेम्पो आणि मारुती वॉगनार गाडीमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला  आहे.


भजनासाठी निघाले होते:

सांगली शहरात आयर्विनपूल या ठिकाणी एक टेम्पो आणि वॉगनार या वाहनांमध्ये रात्री 10 च्या सुमारास समोरासमोर धडक झाली आहे.या भीषण अपघातात मध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.


छोटा टेम्पोमधून तुंग येथील भजनी मंडळ सांगलीवाडीकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळकडे भजन कार्यक्रमासाठी निघाले होते. तर सांगलीहुन एक कुटुंब कसबेडिग्रजच्या दिशेने मारुती वॅगनार गाडी मधून निघाले होती. दोन्ही गाड्या भरधाव होत्या. गाड्या आयर्विन पुलावर आल्या असता भरधाव असणाऱ्या दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली.


दोन्ही गाड्यांचा चक्काचूर :

ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये टेम्पो चालक आणि टेम्पोमधील एक वृद्ध महिला यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही गाड्यांमध्ये असणारे सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगली पोलिसांनी धाव घेतली. तर उशिरा रात्री उशिरापर्यंत मृत आणि जखमींच्या नावाचा शोध सुरू होता.

Post a Comment

0 Comments