google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘येथील’ शाळेमध्ये १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; परिसरात मायक्रो-कंटेनमेंट झोन घोषीत!

Breaking News

‘येथील’ शाळेमध्ये १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; परिसरात मायक्रो-कंटेनमेंट झोन घोषीत!

 ‘येथील’ शाळेमध्ये १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; परिसरात मायक्रो-कंटेनमेंट झोन घोषीत!



डेहराडून : उत्तराखंडातील डेहराडूमधील एका शाळेमध्ये १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तयार केलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. ‘वेल्हम गर्ल्स स्कूल’ मध्ये हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी या शाळेतील मुलांची कोरोना चाचणी केली असता १६ विद्यार्थ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यामुळे डेहराडूनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या परिसरात मायक्रो-कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे.


मागील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध ठिकाणी नव्याने कोरोना रुग्ण वाढायला लागले आहेत. काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत एक कोरोना आढावा बैठक घेतली होती. दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या संख्येपाठोपाठ आता उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत.


तसेच डेहराडूनचे जिल्हा दंडाधिकारी आर राजेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, “या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांची कोरोना चाचणी मंगळवारीच पॉझिटिव्ह आली होती. तसेच कोरोना बाधित मुलांना शाळेच्या आवारात बांधलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments