पैशासाठी छळ झाल्याने विवाहितेची आत्महत्या !
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात आणखी एक हुंडाबळीची घटना घडली असून पैशासाठी झालेला छळ असह्य झाल्याने विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही काळात हुंड्यासाठी छळ करण्याच्या घटना कमी झालेल्या दिसत असल्या तरी देखील अजूनही पैशासाठी विवाहितेचा छळ होत असल्याची प्रकरणे अधूनमधून समोर येतच आहेत. पंढरपूर तालुक्यातील एकालासपूर येथील एका घटनेबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आलेली आहे. सदर फिर्यादीनुसार विवाहितेला 'तू अपशकुनी आहेस' असे म्हटले जात होते आणि कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला आणि या छळाला कंटाळून विवाहितेचे विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मृत विवाहितेचे वडील विठ्ठल सिद्राम पाटील यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तशा आशयाची फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोंढारकी येथील विठ्ठल सिद्राम पाटील यांची मुलगी मनीषा आणि पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील हनुमंत दादा ताड याचं विवाह २०१२ साली झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी मनीषाला मुलगी झाल्यापासून सासू कावेरी दादा ताड आणि आणि सासरा दादा आप्पा ताड हे मनीषाला त्रास देत होते. तिच्या हाताला, पायाला डाव्या मांडीवर जळक्या लाकडाने चटके दिले होते. अपशकुनी म्हणत तिला माहेराहून २५ लाख रुपये घेवून ये म्हणून देखील तिचा छळ केला जात होता. याच जाचहाट आणि छळाला कंटाळून मनीषाने विष प्रश्न केल्याचे विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वामनराव सौदागर गायकवाड (निरोप : ५ मे २०२१)
अकलूज येथे उपचार
अठठावीस वर्षीय मनीषा हिने २३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विष प्रश्न केले आणि त्यानंतर उपचारासाठी तिला अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना मनीषाचा मृत्यू झाला. त्यानंतर मनिषाच्या पित्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
सासू सासऱ्यावर गुन्हा
मनीषाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मनिषाचे वडील विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सासू कावेरी दादा ताड आणि सासरे दादा आप्पा ताड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments