ब्रेकींग : राज ठाकरेंच्या झेंड्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान ; झेंड्याचा कलर तर.....
सोलापूर : केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत.सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शविला.
भारतात सर्वधर्मसमभाव नांदतो. त्यांच्यात भांडणे लावणे योग्य नाही. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा आवाज कमी करण्यासाठी प्रयत्न करता येईल. असे सांगतानाच राज ठाकरे यांनी सुरुवातीला आपल्या पक्षाचा झेंड्याचा कलर सर्व धर्माला अनुसरून ठेवले होते, मात्र अचानक कायं झाले त्यांनी आपल्या झेंड्याचा कलर भगवा केला, टीस्तूं भडकवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मात्र भगवा कलर हा भगवान गौतम बुद्धांनी चिवर म्हणून वापरला त्यामुळे तो कलर हा भडकविण्याचा नाही तर तो शांततेचा कलर आहे.
त्यानुसार राज ठाकरे यांनी शांततेच्या मार्गाने चालावे. त्यांच्या या भूमिकेला आमचा तीव्र विरोध आहे राहणार अशी भूमिका त्यांनी मांडली...पहा ते काय म्हणालेराज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण ती गर्दी मतात रूपांतर होत नाही, त्यांचे 14 वरून 1 आमदार आलेत. राज ठाकरे यांना कधीही बाळासाहेब ठाकरे होता येणार नाही,
कारण बाळासाहेब यांची भूमिका मशिदीवरील भोंगे काढण्याची कधीच नव्हती, ते केवळ आतंकवादी मुस्लिम विरोधी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजप कधीच सोबत घेणार नाही, आम्ही सोबत आहोत तर तळराज ठाकरेंची गरज काय या शब्दात त्यांनी मनसेला लक्ष्य केले.


0 Comments