google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तहसील आवारात महात्मा गांधी यांचा पुतळा शासनाच्या वतीने बसविण्यात यावा- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मागणी

Breaking News

तहसील आवारात महात्मा गांधी यांचा पुतळा शासनाच्या वतीने बसविण्यात यावा- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मागणी

 तहसील आवारात महात्मा गांधी यांचा पुतळा शासनाच्या वतीने बसविण्यात यावा- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मागणी


सांगोला- (प्रतिनिधी)- देशाला पुनर्निर्माण आणि सर्वोदयाचा  विचार देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचाराला जगासमोर ठेवण्यासाठी व भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ अहिंसात्मक असहकार आंदोलनाणे ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, अहिंसात्मक मार्गाने  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले असे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा सांगोला तहसील आवारामध्ये शासनाच्या माध्यमातून बसविण्यात यावा याबाबतची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे.


         आमचे नेते सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सल्ल्याने लवकरच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांच्याकडे भेटून सदर मागणी करणार असल्याचे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले आहे.


          सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिक आपले शासकीय काम करण्यासाठी व इतर कामासाठी सांगोला तहसील आवारामध्ये येत असतात त्यांना महात्मा गांधी यांच्या विचारांची अहिंसात्मक असहकार आंदोलनाची व विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी सांगोला तहसील आवारामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा शासनाच्या माध्यमातून बसविण्यात यावा याबाबतची लेखी मागणी केलेली आहे. यावेळी पांडुरंग पाटील उपस्थित होते

Post a Comment

0 Comments