google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाशिकमध्ये खळबळ : मुलाचा खून करून वडिलांनी गळफास घेत जीवन संपवले , पंचवटी परिसरातील घटना , कारण अस्पष्ट

Breaking News

नाशिकमध्ये खळबळ : मुलाचा खून करून वडिलांनी गळफास घेत जीवन संपवले , पंचवटी परिसरातील घटना , कारण अस्पष्ट

 नाशिकमध्ये खळबळ : मुलाचा खून करून वडिलांनी गळफास घेत जीवन संपवले , पंचवटी परिसरातील घटना , कारण अस्पष्ट

नाशिक:-महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा राहत्या घरात गळफास लावलेला आणि तरुण मुलाचा पलंगावर मृतदेह आढळल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली. गुरुवारी शिवाजी चौक सीतागुंफा परिसरात हा प्रकार उघडकीस आला. जगदीश जाधव (४८) आणि प्रणव जगदीश जाधव (२५) अशी मृतांची नावे आहेत. प्रथम दर्शनी जाधव यांनी मुलाचा खून केल्यानंतर स्वत:ही गळफास लावून घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


जगदीश जाधव हे पत्नी मुलगा मुली यांच्यासह शिवाजी चौक सितागुंफा परिसरात वास्तव्यास होते. रात्री जाधव आणि त्यांचा मुलगा हाॅल मध्ये होते. पत्नी बेडरुम मध्ये झोपलेली होती. सकाळी पत्नी उठल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काॅटवर झोपलेल्या प्रणवला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणव देखील प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी नागरीकांनी पोलिसांना कळवले. पंचवटी पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. जगदीश जाधव यांचा दि.१७ रोजी वाढदिवस साजरा झाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. दोन दिवसांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आल्याने मित्र परिवराता हळहळ व्यक्त होत आहे.


कुणासोबतही वाद नव्हते

जगदीश जाधव हे मनपा कर्मचारी होते. गुरुदत्त सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे ते संस्थापक होते. त्यांचे कुणासोबत वाद नव्हते. मुलासोबत त्यांच्यामध्ये वाद असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले असले तरी जाधव इतके टोकाचे पाऊल उचलतील असे वाटले नव्हते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments