google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..! मोदींच्या सभा स्थळापासून काही अंतरावर स्फोट.. पोलिसांची धक्कादायक माहिती..

Breaking News

खळबळजनक..! मोदींच्या सभा स्थळापासून काही अंतरावर स्फोट.. पोलिसांची धक्कादायक माहिती..

 खळबळजनक..! मोदींच्या सभा स्थळापासून काही अंतरावर स्फोट.. पोलिसांची धक्कादायक माहिती..

जम्मू-काश्मिरमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (24 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यापूर्वी जम्मूतील बिश्नाह शिवारातील एका शेतात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय.


पंतप्रधान मोदी हे आज पल्ली, सांबा येथे पंचायत परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला.. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच अवघ्या काही अंतरावर स्फोट झाल्याने पोलिस सतर्क झाले असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे..


Advertisement

याबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.. ते म्हणाले, की “जम्मूतील बिश्नाहमधील ललियाना गावातील एका शेतात हा संदिग्ध स्फोट झालाय. वीज पडल्यामुळे किंवा उल्कापातामुळे हा स्फोट झाला असावा. दहशतवादी हल्ल्याशी त्याचा काही एक संबंध नाही.. मात्र, या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे..”


तीन वर्षांनी मोदींचा दौरा

दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर 3 वर्षांनी पंतप्रधान मोदी हे जम्मू-काश्मीरला भेट देत आहेत. जम्मूतील सांबा जिल्ह्यातील पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. देशभरात ग्रामसभांचे आयोजन केले जाणार असून, पंतप्रधान त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतींचाही गौरवही केला जाणार आहे..


पीएम मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे..


अतिरिक्त सुरक्षा दल तैनात

पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. गुप्तचर यंत्रणा सतर्क असून, पाकिस्तानच्या सीमेतून ड्रोन घुसण्याची शक्यता असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. रॅलीत एक लाख लोक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे..


सांबा व आसपासच्या परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौक्या वाढवल्या आहेत. महामार्ग आणि त्यालगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले..

Post a Comment

0 Comments