मराठी चित्रपट "अशी ही भन्नाट भिंगरी " च्या वतीने झाला पत्रकार डॉक्टर प्रवीण निचत ह्यांचा सत्कार
मराठी चित्रपट "अशी ही भन्नाट भिंगरी " चे पोस्टर अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन 121नवी पेठ गांजवे चौक पुणे येथे संपन्न झाला. गेल्या चौदा महिन्या पासून ह्या चित्रपटाची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अक्ख्या भारतात चालू होती.
जास्तीत जास्त महाराष्ट्रात सर्वत्र जाहिरात केल्या बद्दल अभिनेत्री आशु सुरपूर ने पत्रकारांच्या कामाची घेतली दाखल व तीच्या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्यात पत्रकार डॉक्टर प्रवीण निचत सह इतर पत्रकारांचा शाल, प्रमाणपत्र व पुष्प देऊन केला सन्मान. बहुदा ही पहिली वेळ असावी कि चित्रपटाची जाहिरात केल्या मुळे पत्रकारांचा सन्मान केल्या गेला.
सोहळा अतिशय हसत खेळत वातावरणात पार पडला. ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक आयोजक पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले होते ,प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री काळुराम ढोबळे, उद्योजक श्री राम यादव, निर्माते श्री जनार्धन म्हसकर, श्री डॅनियल रिबेलो, श्री विकास एकनाथ मांढरे, श्री डेरीक डायस, डॉ प्रवीण निचत व इतर मान्यवर उपस्तिथ होते, सर्वांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर प्रवीण निचत हे पत्रकार तर आहेच परंतु आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते निसर्गउपचार तज्ज्ञ व ऍक्युपंक्चरिस्ट असून गेल्या २ दशकांपासून रुग्णांची सेवा करत आहे. त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे तो असा कि ते टेलीफोनद्वारे रुग्णांना घरघुती इलाज सांगून रुग्णांची काळजी घेऊन बरे करतात, ह्याचे ते एकही रुपया कुणाकडून घेत नाही संपूर्णपणे निसस्वार्थ समाज सेवा करत आहेत. ह्या उपक्रमातून त्यांनी जवळ पास २ लाखांच्या वर रुग्णांना बरे केले आहे ज्यांना त्यांनी पहिले देखील नाही.
त्यांच्या कार्याची दाखल वेग वेगळ्या संस्था घेत असल्याने त्यांना १७५ हुन अधिक पुरस्कारने सन्मानित केले आहे. नुकताच त्यांचा सन्मान माननीय राज्यपाल श्री. भागसिंग कोशायरी जी यांच्या हस्ते करण्यात आला, त्याआधी उत्तराखंडचे राज्यपाल, माननीय लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग जी, मिझोरामचे राज्यपाल महामहिम श्री अमलोक रतन कोहली जी यांनीही त्यांचा सन्मान केला आहे.
समाजकार्यासाठी त्यांनी वेग वेगळं क्षेत्र आत्मसात करून ह्या ना त्या रूपाने समाजाची सेवा करत असतात. वेळात वेळ काढून ते पत्रकारिता करतात. डॉक्टर प्रवीण निचत व सौ अनुजा निचत ह्या पती पत्नीने अभिनेत्री आशु सुरपूर ला तीच्या आगामी चित्रपटाला आणि तीच्या भावी आयुष्याला मनापासून शुभाशीर्वाद दिले.


0 Comments