google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरीत अवघ्या साडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Breaking News

पंढरीत अवघ्या साडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

 पंढरीत अवघ्या साडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

 गुन्हा करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी शिताफीने आवळल्या मुसक्या; माढा तालुक्यातील आरोपीच्या 'नीच' कृत्यामुळे पंढरीत संताप


पंढरीत अवघ्या साडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार! गुन्हा करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी शिताफीने आवळल्या मुसक्या; माढा तालुक्यातील आरोपीच्या 'नीच' कृत्यामुळे पंढरीत संताप

पंढरीत अवघ्या साडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडलीय. गुन्हा केल्यानंतर आरोपीने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलंय.


आपल्या घरासमोर थांबलेल्या या मुलीस ' तुला तुझ्या वडिलांनी मेडिकल करण्यासाठी बोलावले आहे ' अशी बतावणी करून विठ्ठल सत्यवान लोखंडे या तीस वर्षे वयाच्या नराधमाने या मुलीला नेले . तिला घेवून तो तुळशी वृंदावनच्या परिसरात असलेल्या चिलारीच्या झुडूपात घेवून गेला आणि तेथे त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगू नको म्हणून तिला धमकीही दिली . कुणाला सांगितलेस तर मारून टाकीन असे धमकावले आणि आरोपी तिथून निघून गेला.


अकस्मात घडलेल्या या सर्व प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरून गेलेली होती . तिला त्रास होऊ लागल्यामुळे तिने आपल्या घरी या घटनेची माहिती दिली आणि प्रकार उजेडात आला . पिडीत मुलीला घेवून तिचे पालक शनिवारी पोलिसात गेले पण नराधम विठ्ठल लोखंडे  (तुळशी , ता . माढा ) हा पाळतीवरच होता. पिडीत मुलगी आणि तिचे पालक पोलीस ठाण्यात आले असता आरोपी लोखंडे त्यांच्या पाठोपाठ आला . झाल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात प्रकरण पोहोचले असल्याचे त्याच्या लक्षात आले होते . पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बाथरूममध्ये तो गेला आणि त्याने आपल्या गळ्यावर ब्लेड मारून घेतले.


परंतु पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या . अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे . बलात्कार , बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण ( पोस्को ) अशा विविध कलमानुसार विठ्ठल लोखंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे . या घटनेने पंढरी हादरून गेली आहे.

Post a Comment

0 Comments