सोलापूर शहर जिल्ह्यातील 3 रेल्वे ब्रीज बांधले जाणार राष्ट्रीय महामार्गाच्या निधीतून : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी सांगोला या ठिकाणच्या रेल्वे ब्रिज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत करण्याची मागणी माढयाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली तसेच सोलापूर शहरातील आसरा रेल्वे पुलाचे काम ही राष्ट्रीय महामार्गाच्या निधीतून व्हावे
अशी विनंती आमदार सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली होती. हे तिन्ही रेल्वे पूल तातडीने मंजुरी करण्याची घोषणा गडकरी यांनी कार्यक्रमात केली केवळ घोषणाच केली नाही तर आणखी रेल्वे ब्रीज आहेत का तेही सांगा असे म्हणून त्यांनी भरभरून दिले.
0 Comments