सांगोला पोलीस ठाणे मोठी कामगिरी चोरी व गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केले
सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विकी बाजारमधुन ब - याच प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत
मा . पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशंगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. ३१८ / २०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीता असताना तसेच सांगोला पोलीस ठाणे हददीतुन गहाळ झालेले
मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून असे निर्देशनास आले की मोठया प्रमाणावर मोबाईल हे कर्नाटक राज्यात गदग , हवेरी , हुबळी , या तीन जिल्हयामध्ये आढळुन येत असल्याने त्यावरून पोलीस निरिक्षक , सांगोला पोलीस ठाणे यांनी सांगोला पोलीस ठाणेकडील एक पथक गुन्हयाचे तपास कामी चोरीचे व गहाळ मधील मोबाईलचा शोध घेणे कामी कर्नाटक राज्यात रवाना करण्यात आले होते .
तरी सदर पथकाने मागील आठ दिवसांमध्ये कर्नाटक राज्यात गदग , हवेरी , हुबळी , या तीन जिल्हयातुन सांगोला पोलीस ठाणे हददीतील चोरीस व गहाळ झालेले एकुण १५ मोबाईल हस्तगत केले असुन त्यांची एकुण किंमत सुमारे ३,५४ , १६० / - रुपये असुन त्यामध्ये व्हीवो , ओपो , सॅमसंग कंपनीचे हे मोबाईल असुन ते तक्रारदार यांना सर्व प्रक्रिया करून परत देण्यात येणार आहेत .
आठवडीबाजार व जनावरांचा बाजार यामध्ये पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असुन पोलीस ठाणे हददीत महूद , कोळा , जुनोनी बाजारात सुदधा गस्त नेमण्यात येते यामुळे गत महिन्यात मोबाईल चोरीच्या घटनाना मोठ्या प्रमाणात आळा बसला असुन यापुढे ही आठवडया बाजार प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे
असे पोलीस निरिक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगीतले . सदर मोबाईल हस्तगत करण्याची कामगिरी श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण , श्री . हिंमतराव जाधव सो , अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण ,
श्रीमती राजश्री पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , पोनि श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / नागेश यमगर , पोहेकॉ / १५४७ दत्ता वजाळे , पोना / ४०२ नागनाथ वाकिटोळ , पोना / १६८२ अभिजीत मोहोळकर , पोना / १४२५ बाबासाहेब पाटील तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ / २२१६ अन्दर अत्तार यांनी मदत करून सदर चोरी व गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केले आहेत .
0 Comments