google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! संतापलेल्या नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला विवस्त्र करून बेदम मारलं

Breaking News

खळबळजनक! संतापलेल्या नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला विवस्त्र करून बेदम मारलं

 खळबळजनक! संतापलेल्या नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला विवस्त्र करून बेदम मारलं

कोल्हापूर - किरकोळ कारणांवरुन पत्नीला सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात विवस्त्र करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार बुधवारी रात्री उशीरा रूईकर कॉलनीशेजारील चांदणेनगरातील भिमविजय हौसिंग सोसायटीत घडला.


प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रूईकर कॉलनी शेजारील भिमविजय हौसिंग सोसायटीत पती-पत्नी मुलांसह राहतात. पत्नी खासगी नोकरी करते. लग्न झाल्यापासून दोघात वारंवार वाद होऊन पती तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शारिरिक व मानसिक त्रास देत होता.


 त्रासाला कंटाळून पत्नी मुलांसह परिसरातील माहेरी राहण्यास गेल्या होत्या. बुधवारी रात्री पत्नी कामावरुन घरी परतली, तिला घरी मुले दिसली नाहीत. पतीने मुलांना नेल्याचे समजले. संतप्त झालेल्या पत्नीने पतीला फोन केला व मुलांना नेण्यासाठी सासरचे घर गाठले. त्यावेळी पतीने तिला 'तु घरी का आलीस?' असा जाब विचारत शिवीगाळ केली. तिच्या अंगावर धावून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यातच विवस्त्र केले. 


त्यानंतर त्याने नाल असलेल्या बुटाने तिच्या चेहर्यावर, हातावर, पाठीत, पोटावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. परिसररातील नागरीकांनी पतीच्या तावडीतून तिची सुटका केली. गुरुवारी शाहुपूरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत

Post a Comment

0 Comments