google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक! बाप देणार होता पोटच्याच मुलीचा नरबळी, मुलीने शूट केला व्हिडीओ आणि पुढं जे झालं..

Breaking News

संतापजनक! बाप देणार होता पोटच्याच मुलीचा नरबळी, मुलीने शूट केला व्हिडीओ आणि पुढं जे झालं..

 संतापजनक! बाप देणार होता पोटच्याच मुलीचा नरबळी, मुलीने शूट केला व्हिडीओ आणि पुढं जे झालं..


राज्यात अनेक ठिकाणी चोरी, खून, अंधश्रद्धा यांमुळेच गुन्हेगारी वाढत नाहीये तर अलीकडेच काही काळापासून गुप्तधनाच्या लालसेपोटीदेखील बळी देण्याची पद्धत चालू आहे. आता महाराष्ट्रात एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीचाच नरबळी देण्याचं ठरवलं होतं. परंतु मुलीच्या सावधानतेमुळे पोलिसांनी हा सर्व प्रकार उधळून लावून होणारा मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.


गेल्या अनेक दिवसापासून मुलीचा वडील हा गुप्तधनाच्या मागे लागला होता. घरी गुप्तधन असल्याचे सांगून बाहेरगावची मंडळी बोलावून पूजापाठ करण्याचा डाव त्याने आखला. यवतमाळच्या मादनी गावात हा संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय. पूजापाठ दरम्यान मुलीचे वडील हे सतत वाल्मिक नावाच्या मांत्रिकाशी बोलत होते. त्यावेळी त्यांना गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा तो मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाले.


अखेर भांडाफोड झालाच…

तेव्हा 24 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी संध्याकाळी 7 वाजेच्या आसपास मुलीला आंघोळ वगैरे आवरून शेजारील खोलीचा दरवाजा लावून आतमध्ये थांबण्यास सांगितले. याशिवाय ते म्हणाले, “तू बाहेर जायचं नाही, तुझं इथं काम आहे”, असं सांगून पुन्हा तिकडे गेले. त्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली.


मुलीने दिलेल्या माहीतीनुसार, आपल्या वडिलांची चर्चा रात्री 9 वाजता एक शेजारील व्यक्ती, शेतात काम करणारा व्यक्ती आणि आणखी 4 पुरुष आणि विशेष म्हणजे यात दोन महिलांचाही समावेश असून यांच्यासोबत चालू होती. हा सर्व भीतीदायक प्रकार चालू असताना त्यांपैकी एक जण म्हणाला की, गुप्तधनासाठी घरातील एक बळी देणं गरजेचं आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी मी मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयार आहे, अशी सहमती दिली. महत्वाचं म्हणजे ते वारंवार ‘वाल्मिक बाबा’ या नावाने मांत्रिकाला हाक मारायचे.


मुलगी हा सर्व प्रकार लपून पाहत होती. तिला संशय आल्याने तीने आपल्याजवळील मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये पुरावा म्हणून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्डयाचा फोटो काढून तो आपल्या यवतमाळ येथील एका मित्राला पाठविला. त्यासोबत ‘माझा गुप्तधनासाठी बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव’ असा संदेशही धाडला. त्यानंतर त्या मित्राने धाडस दाखवत सर्व प्रकार त्याच्या पोलीस सेवेत असणाऱ्या मित्राला सांगितला.


अखेर मुलीच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. कारण त्या मुलीच्या मित्राने यवतमाळ येथील आपल्या पोलीस मित्राला माहिती दिली. त्यावरून ताबडतोब हालचाली करून बाभुळगाव पोलीस व यवतमाळ येथील पोलिसांनी संयुक्तरित्या मादणी येथे घटनास्थळी रेड मारली. पोलिसांनी वेळेवर या प्रकरणात घटनास्थळी असणारे पीडित मुलीच्या वडीलांसह इतर 8 जणांना लगेच कोणतीही घाई न करता ताब्यात घेतलंय. पोलिसांनी मादणी येथे गुप्तधनासाठी सुरू असलेला प्रकार उधळून लावला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य जसे कुदळ, फावडे, टिकास, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले आहे.


पीडित मुलीचे अनेक धक्कादायक खुलासे..

मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, “मी अल्पवयीन असल्यापासून बाहेरगावी शिकत असल्याने शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर यवतमाळमधून घरी येत होते. तेव्हा माझे वडील मला वाईट उद्देशानं हात लावत अत्याचार करीत होते आणि शारिरीक संबंध देखील ठेवायचे. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील ते द्यायचे. माझे वडीलआईला खूप मारहाण करतात, त्यामुळे ती त्यांना घाबरते. मी वडिलांच्या कृत्याबद्दल आईला सांगत होते. पण तेव्हा तुझे वडील तुझा लाड करत असतील असं आई मला म्हणायची. आई सतत आजारी असल्याने त्याचा फायदा वडील उचलत होते. यातून घरात नेहमी वाद, भांडण, मारहाण व्हायचं. यामुळे वडिलाने माझा बळी देण्याचा निर्णय घेतला होता”, असं ती म्हणाली.

Post a Comment

0 Comments