google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत ! सात राज्याना सतर्कतेचे आदेश !

Breaking News

कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत ! सात राज्याना सतर्कतेचे आदेश !

 कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत ! सात राज्याना सतर्कतेचे आदेश !

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने दिलासा मिळाला असतानाच कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल लागू लागली  असून देशातील सात राज्यांना केंद्राने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण होऊ लागली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासू जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून कोरोनाच्या गाळात आर्थिक चक्रे रुतून बसलेली आहेत. गाळात रुतलेली आर्थिक चक्रे बाहेर येण्यास अजून बराच काळ जाणार आहे. कोरोनामुळे जगभरासह देशाचे प्रचंड नुकसान झाले असून प्रत्येकाच्या जवळची माणसं या कोरोनाने हिरावून नेली आहेत त्यामुळे कोरोनाचे नाव घेतले तरी काळजाचा थरकाप उडू लागला आहे. 


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने मोठा विनाश केला, त्या तुलनेत तिसरी लाट तेवढी प्रभावी आणि विनाशकारी ठरली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता कमी झाला असून शासनाने देखील सगळे निर्बंध हटवले आहेत. आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळू लागला आहे तेवढ्यात पुन्हा कोरोनाची चौथी लाट दारावर टकटक करू लागली असल्याचे दिसू लागले आहे त्यामुळे चिंतेत भर पडू लागली आहे. 


तिसरी लाट ओसरत असतानाच चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती. यात मतमतांतरे असली तरी जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि एप्रिल महिन्यातच देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. देशातील सात राज्यात कोरोनाचे रुग्ण सतत वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह काही राज्यात ही वाढ दिसू लागली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या असून केंद्र सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  देशातील ७३४ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे तर २३ जिल्ह्यात ही परिस्थिती अधिक बिकट आहे. या २३ जिल्ह्यात हा दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असून ८ जिल्ह्यात तर तो २० टक्क्यांवर गेला आहे. 


या राज्यांना इशारा !

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारने सात राज्याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यात केरळ, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, मणिपूर, मिझोराम, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीत देखील रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली असून नागरिक चिंतेत दिसत आहेत. 


नव्या रुग्णांत वाढ !

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णापेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. सातशे ते आठशे आधी रोजची संख्या होती परंतु ती आता एक हजारापेक्षा पुढे जात आहे. दिल्लीत तर वेगाने वाढ होत असून रोजचा एकदा दोनशेनी वाढत असल्याचे दिसून आले आहे. रोज नव्या रुग्णांची भर पडत असल्याने दिल्ली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 


मुंबई देखील चिंतेत !

गेल्या काही दिवसांत मुंबईत देखील कोरोनाचा आलेख वर जाऊ लागला आहे. दररोज मुंबईत सरासरीने २९ नवे रुग्ण आढळत होते परंतु बुधवारी हा आकडा ७३ वर गेला असून १७ मार्चच्या नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.  त्यामुळे येथेही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांची होत असलेली ही वाढ चौथ्या लाटेचे संकेत वाटू लागले आहेत. 


राज्यातही वाढ !

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा दैनंदिन एकदा हा शंभरावर पोहोचला आहे. राज्यातील हा आकडा कमी वाटत असला तरी रोज यात वाढ होत असल्यामुळे चिंतेचे सावट पसरू लागले आहे. महाराष्ट्रातील ही वाढ काही ठराविक जिल्ह्यातच असल्याचे देखील सांगण्यात येऊ लागले आहे. हळूहळू वाढत असलेली ही आकडेवारी पुन्हा एकदा चिंतेची परिस्थती निर्माण करू लागली असून चौथ्या लाटेची भीती निर्माण होऊ लागली आहे. 


चिंताजनक टक्केवारी 

देशातील काही राज्यातील टक्केवारी चिंता निर्माण करणारी आहे. पाच टक्क्यापेक्षा पुढे पॉझिटिव्हिटी दर गेला तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे. केरळमध्ये १४ जिल्हयात हा दर दहापेक्षा अधिक आहे तर ५ जिल्ह्यात १५ पेक्षा जास्त आहे, दोन जिल्ह्यात हा दर २० टक्क्यावर गेला आहे. मिझोराम, अरुणाचल आणि हिमाचल प्रदेशात देखील हा दर असाच वाढता आणि परिस्थिती हाताबाहेर चालल्याचा आहे.

Post a Comment

0 Comments