google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात लोडशेडींग; 'या' राज्यात 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

Breaking News

महाराष्ट्रात लोडशेडींग; 'या' राज्यात 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

 महाराष्ट्रात लोडशेडींग; 'या' राज्यात 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय


आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबही जिंकले असून पंजाबमध्ये सरकार स्थापन केले आहे. पंजाबमधील आपचे पहिले मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शपथ घेतल्यानंतर धडाडीने निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनानुसार नागरीकांना प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय आता पंजाब सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलैपासून राज्यातील नागरिकांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.


महाराष्ट्रात एकीकेड लोडशेडींगचं संकट सुरू झालं असतानाचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंजाबमध्ये आप आदमी पक्षाला सरकार स्थापन करुन केवळ एकच महिना झाला आहे. या निमित्ताने पंजाब सरकारने 30 दिवसांच्या कामकाजाचं रिपोर्ट कार्ड जारी केलं.


या रिपोर्ट कार्डमध्ये 1 जुलैपासून राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आपचे प्रवक्ता नील गर्ग यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.  दरम्यान, भगवंत मान यांनी दिल्लीत याच आठवड्यात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.


प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच पंजाबातील बेरोजगारी कमी करणे आणि प्रत्येक महिलेला दरमहा 1,000 रुपयांची आर्थिक मदत करणे अशी आश्‍वासने आम आदमी पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्या आश्‍वासन पुर्तीसाठी मुख्यमंत्री मान हे आता प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments