सोलापूर जिल्ह्यातील घटना अरेरे ! बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले
सोलापूर – शेतातील मोटार चालू करण्यात जातो असे सांगून गेलेल्या एका तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामगाव येथे घडली आहे.
सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बार्शी तालुकातील जामगावचा रहिवासी होता. सुरज हा १२ वीत शिकत होता. त्याने नुकतीच परीक्षा दिली होती.
तो १४ एप्रिल रोजी घरातून रात्री नऊच्या सुमारास शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेला होता. परंतु रात्री घरी आलाच नाही. शेतात जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
त्यानंतर त्याला खाली उतरवून घरच्यांनी पोलिसांना याबाबद माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनेसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
0 Comments