google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे तालुका स्तरीय खरिप हंगाम सन २०२२ नियोजन बैठक आमदार अॕड श्री शहाजीबापू पाटिल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न ........

Breaking News

सांगोला येथे तालुका स्तरीय खरिप हंगाम सन २०२२ नियोजन बैठक आमदार अॕड श्री शहाजीबापू पाटिल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न ........

सांगोला येथे तालुका स्तरीय खरिप हंगाम सन २०२२ नियोजन  बैठक 

आमदार अॕड श्री शहाजीबापू पाटिल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न ........

सांगोला /प्रतिनिधी काल दि.२२ एप्रिल २०२२ रोजी सांगोला तालुक्याची खरिप हंगाम पुर्व नियोजन बैठक तालुक्याचे आमदार मा.अॕड.श्री शहाजीबापू पाटिल यांचे अध्यक्षतेखाली बचत भवन सांगोला येथे घेण्यात आली.


सदरील बैठकीस माजी विधानपरिषद सदस्य श्री. दिपकआबा साळुंखे पाटिल, माजी उपसभापती श्री नारायण जगताप , कृषि उपसंचालक राजकुमार मोरे, तहसिलदार अभिजित पाटिल , कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी , कृषि निविष्ठा विक्रेते , शेतकरी मित्र व प्रगतशिल शेतकरी उपस्थित होते. 


     खरिप हंगाम सन २०२२ चे सुक्ष्म नियोजन , सर्व योजनांचे गतवर्षीची स्थिती व पुढिल नियोजन, पेरणीचे नियोजन , संभाव्य पिक बदल,बियाणे खते उपलब्धता नियोजन, राबवायाच्या मोहिमा , पिन होल बोरर समस्या ई विषयावर सविस्तर सादरीकरण तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले. 



सदरील बैठकीमध्ये महाडिबीटी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रक्टर व औजारे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर विविध योजनांचे पुर्वसंमतीपत्र , डाळिंब पिकावरील पिन होल बोरर व्यवस्थापण सल्ला पत्रक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. स्मार्ट योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर केलेल्या माणभुमी कडलास व शिवबंधन वाणीचिंचाळे या शेतकरी उत्पादक कंपन्याचे अभिनंदन करण्यात आले.


 यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटिल यांनी गरजु शेतकऱ्यांना बियाणे व खते वितरणाचे काटेकोर  नियोजन करण्याबाबत  , कृषि विभागाचे सर्व स्टाफ यांनी गावांमध्ये उपस्थितीत राहून कृषि विभागाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे आंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना दिल्या. 


बैठकीमध्ये आमदार मा. अॕड शहाजीबापू पाटिल यांनी पिक पद्धतीत होणाऱ्या बदलानुसार तालुक्यामध्ये पिक नियोजन करणे , रासायनिक खते व  बियाणाचे काटेकोरपणे नियोजन करणेबाबत, सुर्यफुलाची वाढणारी लागवड व त्यास लागणारे बियाणेनियोजन डाळिंब निघालेल्या ठिकाणी पर्यायी धोरण ठरवणेबाबत, निविष्ठा बाबत येणाऱ्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे , कृषि विभागाच्या सर्व योजना अजून प्रभावीपणे राबविणेबाबत सुचना केल्या.

श्री विकास काळुखे कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments