google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी : हरिभाऊ पाटील

Breaking News

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी : हरिभाऊ पाटील

 पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी : हरिभाऊ पाटील 

सांगोला/प्रतिनिधी :सांगोला शहर व तालुक्यात आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई थेट नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केली आहे.


सांगोला तालुक्यांमध्ये सर्वत्र विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यामध्ये आवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये वीज पडून जनावरे मरण पावले आहेत. यासह फळबागा उध्वस्त झालेल्या आहेत. तर काही शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. यामध्ये अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत. 


डाळिंब फळ बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आर्थिक व्यवस्था मागील दोन ते तिन वर्षापासून पूर्वपदावर आलेली नाही. नागरिकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवणे हाच एकमेव प्रश्न असून यामध्ये आस्मानी संकट हे तालुक्यातील नागरिकांना मोठा फटका बसणार ठरला आहे.


 आवकाळी पावसाने अनेक नागरिकांना मोठा फटका बसला असल्याने या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यासंदर्भात कृषी विभागाने व महसूल विभागाने संपूर्ण पंचनामे करावेत.


 याबाबत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व प्रा. पी. सी. झपके सर यांनी लक्ष घालून तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. अशी ही विनंती वजा मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments