मी माझ्या लहान बाळाला जीवे मारून पुरले आहे , लगेच गाडी पाठवा .
लोणंद, तरडगाव ता. फलटण येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पाच महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन खून केल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे.
खून केल्यानंतर आईने मी माझ्या लहान बाळाचा खून केला असून तुम्ही लगेच गाडी पाठवा नाही तर आणखी दुसऱ्याचा खून करेन असे पोलिसांना स्वतः फोन करून सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेस अटक केली आहे.
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांढरी , तरडगाव ता. फलटण येथील सौ.आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिण्याच्या लहान बाळाला दि.12 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता "मी माझ्या लगान बाळा जीवे मारून त्याचा मृतदेह पुरला आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा, नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचातरी खुन करीन, असे पोलिसात सांगितले. तिच्या फोन नंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी व सहकाऱ्यांसमवेत त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.
यामध्ये तिने तिचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड (वय 5 महिने) याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन जिवे ठार मारल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेस ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असून महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, संशयीत आरोपीला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर रविवार दि.24 रोजी सपोनि विशाल वायकर व सहकाऱ्यांनी सरकारी पंचासमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खोदून मृतदेह बाहेर काढला. तसेच मृतदेहाचे पोस्टमार्टेम जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी केले. पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.


0 Comments