google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जवळ्याचा पाटील वाडा आज ही अभिलेख न्यायालय....

Breaking News

जवळ्याचा पाटील वाडा आज ही अभिलेख न्यायालय....

 जवळ्याचा पाटील वाडा आज ही अभिलेख न्यायालय.... 

सांगोला: जवळा गाव हे लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातील मोठे गांव…या गावात हिंन्दु,मुस्लीम,जैन,गुजराती,निर्वासित,नवबौध्द असे सर्वधर्मिय व अठरा पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत..येथे आजवर कधीही धार्मिक व जातीय तेढ व तान तनाव निर्माण झाला नाहि…


अर्थात हे सर्व पिढ्यान पिढ्या असे आनंदि वातावरण चालत येण्यासाठी एकमेव कारण म्हणजे या गावास लाभलेले “साळुंखे पाटील”घराणे! या साळुंखे पाटील घराण्याने नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन सर्व सामान्यांना नेहमी न्याय देण्याचीच भुमिका निभावली आहे.आणि त्याचाच परिणाम येथे सर्वंकश न्याय मिळत आला आहे….आमाजीराव साळुंखे पाटिल….कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे पाटिल…


आणी आता दिपक आबा या तिसर्‍या पिढीने केवळ आणी केवळ न्यायाची भुमिका बजावलि..खरतर ईथल्या सर्वसामान्य नागरीकांना ,गोरगरीब,दिनदुबळ्यांना!पददलीतांना प्रशासकीय व न्यायालयीन कामकाजावर विश्वास नसेल पण ईथल्या पाटिल वाड्यात न्याय मिळतोच अशी निस्सीम धारणा आहे..म्हणुनच आजही जवळ्याचा पाटील वाडा व आजचा दिपक आबांचा दरबार न्यायासाठी समस्त तालुकावासियांच्या विश्वासास पात्र ठरला अाहे….


खरं तर आज ईतका लिखान प्रपंच करण्याचे कारण म्हणजे मी जवळा गावालगत असलेल्या बुरंगेवाडीतील एक सामान्य आणि जवळा परिसरात असलेल्या अल्पसंख्य लोणारी समाजातील सामाण्य माणुस…बुरंगेवाडी गावात आमचे शेत असुन जवळा ते जवळा स्टेशन रोड पासुन अगदी थोड्या अंतरावर आमची शेतवस्ती आहे..परंतु मुख्य रस्ता ते माझी शेतजमीन या दरम्यान एका मराठा बांधवाचे शेत आहे…अर्थात हा मराठा बांधव पुर्विपासुनच साळुंखे पाटील घराण्याशी एकनिष्ठ आहे.कींबहुना यांचे बालपनच पाटील वाड्यात गेले अाहे.ईतकी जवळीक यांची साळुंखे पाटील घराण्याशी आहे.


आणी याच महाशयांनी आमच्या शेतवस्तीकडे जाणार्‍या रस्त्याला नेहमीच अडचणी आणल्या होत्या…अतीशय चिकनमातीयुक्त जमिन असल्यामुळे पावसाळ्यात अक्षरशा अामच्या डोळ्यातुन पाणी यायचे…गेली अनेक वर्षे हा त्रास आम्ही सहन करीत राहीलो..प्रशासनाकडे दाद मागीतली…न्यायालयात खेटे घातले पण आमच्या रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता….


अखेर शेवटचा पर्याय म्हणुन आम्ही दिपक आबांना साकडे घातले…आमच्यातील काही लोकांचा समज होता…ज्या व्यक्तीने रस्त्याची अडवणुक केली आहे.ते अाबांचे अतीशय निकटवर्ती आहेत.,शिवाय जातीने मराठा आहेत..आणि आपण तर या भागातील अल्पसंख्य लोणारि आहोत


 ….मग आपणास खरंच न्याय मिळेल का?परंतु दिपक आबांनी आमची कैफीयत ऐकुन घेतली व पंचेचाळीस अंश तापमाणात अतिशय कडक उन्हात खुद्द आबासाहेब आमच्या बांधावर आले..आबांनी सर्व परीस्थिती बारकाइने पाहीली…आणि आबांच्या सद्दसद विवेक बुध्दीला जे वाटते तो न्याय निवाडा केला..,आबांच्या न्यायमंदीरातुन कोणताही दुजाभाव न करीता आदेश आला ..आणी आम्हाला हवा तसा रस्ता करुन देण्याचा आदेश त्या मराठा बांधवाला दिला..अर्थात येथे आबांनी जो निर्णय दिला तो त्या शेतकरी बांधवांनी मान्य केला आणी आम्हास आबांनी आदेश दिल्या प्रमाणे रस्ता बणविण्यास परवानगी


 दिली..अर्थात हे सहज शक्य नव्हते…परंतु पाटलांच्या वाड्यातुन आलेला तटस्त न्यायामुळे आम्हासारख्या सर्वसामान्यांना न्याय मिळाला…हे फक्त दिपक अाबांमुळेच शक्य झाले…याही पुढे तालुक्यातील कोणत्याही नेत्याकडे अशाप्रकारची समस्या आणी ती कोणत्याही गावातील आणी जाती समुदायातील असैत तर तिथे असा तटस्त न्याय मिळेल का??कारण तिथे प्रथम समोरील व्यक्ती कोणत्या जातीची?कोणत्या पक्षाची?


याचा विचार करुनच प्रश्नाची सोईस्कर सोडवणुक होईल….पण ईथे मात्र सत्यासाठी आणी न्यायासाठी आपले निवटवर्तीय दुखावले तरी फीकीर न करणारा पण न्यायाशी प्रतारणा न करता व दिलेल्या न्यायामुळे आपल्या राजकीय बेरीज वजाबाकीची फीकीर न करता नेहमी न्यायाच्या बाजुने खंबिरपणे उभा राहणारा एकमेवाद्वितीय न्यायाचा पुरस्कर्ता करणारा राजा म्हणजेच दिपक अाबा होय…हे नक्की

Post a Comment

0 Comments