ओमायक्रॉननंतर आता नव्या “व्हेरियंटचे” देशात आगमन….!
नवी दिल्ली: देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पंरतु, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने केंद्रासह राज्य सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. ओमायक्रॉन नंतर आता ‘एक्सई’ व्हेरियंट देशात दाखल झाला आहे. जगात सुरूवातीला ब्रिटेनमध्ये या व्हेरियंटने ग्रस्त रुग्ण आढळले होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिला ‘एक्सई’ व्हेरियंट ग्रस्त आढळला.
एक्सई व्हेरियंटवर कोरोना लसीचा प्रभावा संबंधी चर्चा करण्यात आली आहे. नवीन व्हेरियंटचा अभ्यास तसेच त्यावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.
आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यासह उपचारकरीता आवश्यक असलेल्या औषधी तसेच त्याच्या उपलब्धतेसंबंधी सातत्याने आढावा घेण्याचे निर्देश मांडविया यांनी दिले आहेत. देशात सुरु असलेल्या कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला वेगाने राबवण्यात येईल. तसेच सर्व नागारिकांचे लसीकरण पुर्ण करावे, यावर या बैठकीत भर दिला आहे.
ओमायक्रॉनच्या तुलनेत एक्सई व्हेरियंट १० पटीने अधिक संसर्गजन्य आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह दिल्ली, मिझोरम, हरियाणा तसेच केरळ ला पत्र पाठवून कोरोना तपासण्या, ट्रॅकिंग, उपचार, तसेच कोरोनाबाधितांच्या देखरेखीसंबंधी पत्रव्यवहार केला होता.
0 Comments