महाराष्ट्रात दिवसा किंवा रात्री 8 तास लाईट जाणार
दिवसा किंवा रात्री तब्बल ‘इतके’ तास लाईट जाणार? महाराष्ट्रावर वीज संकट
‘लोडशेडिंग’ हा शब्द महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून समाप्त झाला होता. विजेची अधूनमधून टंचाई जाणवायची परंतु अनेक तासांचे लोडशेडिंग महाराष्ट्र विसरला होता.
परंतु आता जसजसे वातावरणात गर्मी वाढू लागली तसतसे राज्यात वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर येत्या काही दिवसांत वीजही महाग होऊ शकते. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हे मान्य केले असून, राज्यात किमान लोडशेडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले आहे.
परंतु आता राज्यावर एक भयानक वीज संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सकाळ’ने प्रकाशित केलेली बातमी शेअर करत लोड शेडिंगच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे सकाळने प्रकाशित केलेल्या त्या बातमीत राज्यात दरदिवसा दिवसा किंवा रात्री तब्बल आठ तास लोडशेडिंग राहील. याचाच अर्थ दिवसभर तब्बल आठ तास लाईट नसेल. जर असे झाले तर मोठी चिंताजनक बाब निर्माण होणार आहे.
भर उन्हाळ्यात अशाप्रकारचं वीजसंकट कोसळल्यास सर्वांचा घाम निगेल हे मात्र नक्की. त्यात शेतकऱ्यांची दैना ही सर्वात जास्त असेल. दरम्यान दुसरीकडे महावितरण कंपनीची थकबाकी ६५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
जवळपास थोडे अधिक रकमेने कंपनी कर्जात आहे. प्रचंड थकबाकी, डोक्यावर कर्ज आणि बाजारात घसरलेली पत यामुळे नवे कर्ज काढता येत नाही आणि उन्हाळ्यात लागणारी जास्तीची वीज अधिक दराने खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी नाही, अशा कात्रीत महावितरण अडकली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? “सावध! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण, परिणाम दिसू लागले आहेत.
अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
0 Comments