google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 3 तारखेनंतर भोंगे उतरवा, नाहीतर त्याठिकाणी हनुमान चालिसा लागणारच; राज ठाकरे

Breaking News

3 तारखेनंतर भोंगे उतरवा, नाहीतर त्याठिकाणी हनुमान चालिसा लागणारच; राज ठाकरे

 3 तारखेनंतर भोंगे उतरवा, नाहीतर त्याठिकाणी हनुमान चालिसा लागणारच; राज ठाकरे

ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या सभेत विरोधकांनासह सत्ताधारी तसेच संपुर्ण राजकीय नेत्यांना या सभेतुन उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ठाण्यातील सभेतील थेट प्रेक्षपण जम्मू काश्मीरमध्ये देखील करण्यात येणार आहे. यासंबंधी काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. तर ठाण्यातील या सभेत राज ठाकरे यांनी विरोधकांवर तोप डागली. त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भूमिका देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलीत.


सर्वोच्च न्यायलायने देखील मशिदीवरील भोंग्याबाबत निर्णय दिला आहे. जर न्यायालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे तर गृहखातं मग यावर अमंलबजावणी का करीत नाहीत. असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.  मशिदीवरील भोंग्यांचा सगळ्यांना होत आहे. त्यामुळे येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरावेच लागणार, नाहीतर देशभरात संपुर्ण मशिदीसमोरच हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.


सलीम शेख यांच्या मतदार संघात 95 टक्के हिंदू लोक आहेत तरी तेथून सलीम शेख मामा मुस्लिम म्हणून निवडून येतात. या देशात प्रमाणिक मुस्लिम भरडला जात आहे. यावेळी त्यांनी मदरशामध्ये चाललेल्या प्रकरांवर देखील त्यांनी बोट ठेवली होती.


शरद पवार यांच्यावर टिका करताना म्हणाले राज ठाकरे भूमिका बदलतो. हे राष्ट्रवादी काॅंग्रेसनं मला सांगावं. काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले शरद पवार पुन्हा काॅंग्रेसमध्ये गेले होते. यावेळी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा देखील शरद पवारांनी काढला होता. त्यामुळे राजकीय भूमिका मी बदलली नाही. असंही ते म्हणाले होते.

Post a Comment

0 Comments