google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

Breaking News

ब्रेकींग : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

 ब्रेकींग : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

सोलापूर : शेती जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. सुखदेव मारुती सुतार, वय ५३ वर्षे पद मोजणीदार, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा, जवळगाव ता. बार्शी असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.


यातील तक्रारदार यांची मौजे सासुरे तालुका बार्शी येथील शेती जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम आलोसे सुतार यांनी स्वतः स्विकारली म्हणुन त्यांच्याविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस अमलदार पोना/ घुगे पोशि/ जानराव सर्व नेम अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.सोलापूर : शेती जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. सुखदेव मारुती सुतार, वय ५३ वर्षे पद मोजणीदार, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा, जवळगाव ता. बार्शी असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.


यातील तक्रारदार यांची मौजे सासुरे तालुका बार्शी येथील शेती जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम आलोसे सुतार यांनी स्वतः स्विकारली म्हणुन त्यांच्याविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस अमलदार पोना/ घुगे पोशि/ जानराव सर्व नेम अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments