google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 म्हणून मोदींनी महाराष्ट्र सरकारला सुनावले; महाराष्ट्र पेट्रोलवर घेतोय ‘एवढा’ कर

Breaking News

म्हणून मोदींनी महाराष्ट्र सरकारला सुनावले; महाराष्ट्र पेट्रोलवर घेतोय ‘एवढा’ कर

 म्हणून मोदींनी महाराष्ट्र सरकारला सुनावले; महाराष्ट्र पेट्रोलवर घेतोय ‘एवढा’ कर

मुंबई :पेट्रोल-डिझेलच्या किमती दर काही दिवसांनी वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी दररोज 80 पैसे प्रति लीटर इतकी पेट्रोल दरवाढ करत जवळपास 10-15 दिवस दरवाढ केली. त्यामुळे पेट्रोल-डीझेलच्या दरांनी आजवर जी पातळी गाठली नव्हती, ती पातळी गाठली. यापूर्वी कधीच दर 100 पुढे गेले नव्हते मात्र आता परभणीसारख्या भागातील लोक 123 रुपये दराने पेट्रोल भरत आहेत. आधीच वाढलेली महागाई त्यात दैनंदिन गरज असणारे इंधन दर भडकले आहेत. मात्र पेट्रोल-डीझेल याचे मूळ दर आणि केंद्र तसेच राज्य सरकार घेत असलेले दर हे मूळ किमतीच्या तुलनेने जास्त आहेत. याच कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारला सुनावले आहे.


महागाई तसेच कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला. काही राज्यांनी कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला, परंतु काही राज्यांनी कर कमी केला नाही. विशेषतः महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड आणि तमिळनाडूने केंद्र सरकारचे म्हणणे मान्य केले नाही. त्यामुळे या राज्यातील सर्वसामान्यांवर भार पडला.


देशात महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलवर सर्वाधिक कर आकारला जातो. 100 रुपयांच्या पेट्रोलवर 65 रुपये कर आकारला जातो. आंध्र प्रदेशमध्येही 65 रुपयांचा कर आकारला जातो तर मध्यप्रदेश आणि केरळमध्ये 61 रूपये, राजस्थानमध्ये 60 रूपये, छत्तीसगढ-कर्नाटकमध्ये 55 रूपये, पश्चिम बंगालमध्ये 54 रूपये, बिहार-झारखंडमध्ये 52 रूपये, जम्मू-कश्मीरमध्ये 50 रूपये, उत्तर प्रदेशमध्ये 48 रूपये, गुजरातमध्ये 46 रूपये कर द्यावा लागतो.

Post a Comment

0 Comments