google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शाळेतल्या 13 विद्यार्थिनींवर बलात्कार, 8 जणी गर्भवती; शिक्षकाला फाशीची शिक्षा

Breaking News

शाळेतल्या 13 विद्यार्थिनींवर बलात्कार, 8 जणी गर्भवती; शिक्षकाला फाशीची शिक्षा

 शाळेतल्या 13 विद्यार्थिनींवर बलात्कार, 8 जणी गर्भवती; शिक्षकाला फाशीची शिक्षा

नराधम शिक्षकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे या 13 पैकी 8 विद्यार्थिनी गर्भवती राहिल्या होत्या. या प्रकरणी शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 5 एप्रिल : शाळेतल्या शिक्षकानेच  विद्यार्थिनीवर बलात्कार  केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. पण अलीकडे उघडकीस आलेल्या एका घटनेत या नराधम शिक्षकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे या 13 पैकी 8 विद्यार्थिनी गर्भवती राहिल्या होत्या. या प्रकरणी शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 


ही संतापजनक घटना इंडोनेशियामध्ये  घडली असून, हॅरी विरावन  असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. 2016 ते 2021 दरम्यान, हॅरी विरावनने 12 ते 16 वयोगटातील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. त्यापैकी 8 मुली गर्भवती झाल्या होत्या. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशांपैकी एक आहे. हजारो इस्लामिक बोर्डिंग शाळा  आणि इतर धार्मिक शाळा आहेत. जिथे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण दिलं जातं. त्यापैकीच एका शाळेत ही घटना घडली. इंडोनेशियातील न्यायालयाने या शिक्षकाला फाशीची शिक्षा सुनावली आहे, या शिक्षकाने इस्लामिक शाळेतील 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केला होता. 


या पूर्वी या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र, या शिक्षेला फिर्यादी पक्षाने विरोध केला आणि फाशीची मागणी केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शिक्षक हॅरी विरावनच्या या कृत्यानंतर इंडोनेशियातील धार्मिक बोर्डिंग स्कूलच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले होते, त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. तसंच मुलींना अशा शाळांमध्ये कसं सुरक्षित ठेवायचं, अशी चिंताही पालकांना सतावू लागली होती. 


या संदर्भात आज तकनं वृत्त दिलंय. दरम्यान या पूर्वी, शिक्षक हॅरी विरावनला बांडुंग येथील शहर न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या प्रकरणी सरकारी वकिलांनी फाशीच्या शिक्षेसाठी अपील केलं. बांडुग हायकोर्टाने सोमवारी या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाच्या वेबसाईटवर या प्रकरणी निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देत आहोत,' असं न्यायालयानं म्हटलंय. तर, या निकालावर हॅरीच्या वकिलाने भाष्य करण्यास नकार दिला आहे. 


न्यायालयाच्या निकालावर तुम्ही अपील करणार का? , असं विचारलं असता कोर्टाकडून पूर्ण आदेश मिळाल्यानंतर याप्रकरणी भाष्य करू, असं त्यांनी सांगितलं. देशाच्या बाल संरक्षण मंत्र्यांनीही या प्रकरणात फाशीच्या शिक्षेला पाठिंबा दिला आहे. मात्र, देशातील मानवाधिकार आयोगाने फाशीच्या शिक्षेला विरोध केला आहे. न्यायालयाचा हा निर्णय योग्य नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments