अंबाजोगाईत ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार ; पोलिसात गुन्हा दाखल.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या डोंगरपिंपळा येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ८ वर्षीय चिमुकलीवर दि.१९ मार्च २०२२ शनिवार रोजी दुपारी ०३:०० च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना घरात बोलावून नराधम आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर वय-२३ याने बळजबरीने तोंड दाबून बलात्कार केला.
यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याच्या धमक्या देवुन बाल मनावरही मोठा घात केला. ही घटना अतिशय संतापजनक असुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
याप्रकरणी चुलत्याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर वय-२३ वर्षे रा. डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई याच्या विरोधात कलम ३७६, ३७६ (२), ३७६ (ab) ५०४, ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या संदर्भात आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची पिडीत कुटुंबीय भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याची माहिती मिडीयाशी बोलताना नातेवाईकांनी दिली आहे.
0 Comments