google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील सोलापूरसह बारा जिल्ह्यात पावसाची शक्यता !

Breaking News

राज्यातील सोलापूरसह बारा जिल्ह्यात पावसाची शक्यता !

 राज्यातील सोलापूरसह बारा जिल्ह्यात पावसाची शक्यता !

मुंबई : सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यात आज पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने  व्यक्त केली आहे.


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून तापमानात मोठी वाढ होत असतानाच दुसरीकडे 'असानी' वादळ येत आहे. या वादळाचे येत्या काही तासात चक्री वादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त करणायत आली आहे. बंगालच्या उपसागरात मार्च महिन्यातच चक्री वादळाची परिस्थिती तयार झाली असून


 आग्नेय बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत झालेले आहे. बांगला देश - उत्तर म्यानमारच्या दिशेने कमी दाबाचे हे क्षेत्र पुढे सरकत आहे. त्यामुळे येत्या काही तासात या वादळाचे 'असानी' चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अर्थात याचा भारतीय किनारपट्टीला धोका नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


भारताच्या किनार पट्टीला या चक्री वादळाचा धोका नसला तरीही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वाऱ्यामुळे महाराष्ट्र राज्यातील तापमान काहीसे घटले असल्याचे दिसत आहे. आज कोकण परिसर, घाट परिसर, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे या परिसरात पावसासाठी अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तापमानात वाढ होत असताना आता मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असतानाही पावसाळी हवा वाहू लागली आहे. 


सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली परिसरात आज सकाळीच पाउस सुरु झाला. सदर बारा जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होते 


तसेच तपमानात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या बारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सारी येण्याची शक्यता असून राज्यात अन्यत्र हवामान कोरडे राहील असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   उद्यापासून देखील कमी  अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती राहणार आहे.

Post a Comment

0 Comments