धक्कादायक घटना, चिमुरडीवर बलात्कार करून, मग पट्ट्याने मारहाण!
शेजाऱ्यानेच 13 वर्षाच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कर केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील नजफगढ परिसरात उघडकीस आली आहे. इतकेच नाही यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने नराधमाने तिला पट्ट्याने मारहाण ही केली. याप्रकरणी नजफगढ पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करीत पुढील तपास सुरु केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीला बांधून ठेवलेपीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत नजफगढमधील जय विहारमध्ये राहते.
सोमवारी मुलगी आईला शोधण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली होती. तिथे आरोपीही उपस्थित होता. आरोपीने मुलीला बंधक बनवत तिच्याशी जबरदस्ती करु लागला. यामुळे मुलगी जोरजोरात ओरडायला लागली. म्हणून आरोपीने पट्ट्याने तिला मारहाण केली. नंतर तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबत तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. बलात्कार केल्यानंतर मुलीचे हात-पाय बांधून तिला खोलीत कोंडून पळून गेला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आई त्या खोलीत धावत गेली असता मुलीची अवस्था पाहून ती हैराण झाली. तिने मुलीची सुटका करत नजफगढ पोलिस गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली.

0 Comments