अन्यथा गाडी होईल आता थेट जप्त !
नवी दिल्ली : गाडीला फिटनेस प्लेट लावणे आता बंधनकारक होणार असून ही प्लेट नसल्यास वाहन थेट जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे . केंद्र सरकारने याबाबत मोठे पाउल उचलले आहे .वाहनापासून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करीत असून वाहनांच्या विषयी एकेक कायदे केले जात आहेत . वरचेवर प्रदूषण वाढत असून यात वाहनांच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा सहभाग आहे . हे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाउल उचलले असून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे . जनता आणि यांच्याकडून भागधारक सूचना मागविण्यात आल्या असून एक महिन्यात या सूचना प्राप्त होतील . त्यानंतर शासनाकडून नवा नियम लागू करण्यात येणार आहे .देशातील सर्वच खाजगी आणि व्यावसायिक वाहनाच्या विंडशिल्डवर फिटनेस प्रमाणपत्राची प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे . वाहनांच्या • नंबरप्लेटसारखीच असलेल्या या प्लेटवर संबंधित वाहन किती तारखेपर्यंत फीट असेल याची तारीख निळ्या स्टिकरवर पिवळ्या रंगात लिहिलेली असणार आहे . म्हणजेच वाहनांच्या फिटनेसचे एक्सपायरी डेट ( Expiry date ) नमूद केलेली असणार आहे . अशी प्लेट नसलेल्या वाहनावर वाहनजप्तीची कारवाई केली जाणार असून ती पुन्हा कधीच रस्त्यावर दिसणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे .लाखों जुनी वाहने वर्षांपेक्षा जुनी असलेली दहा ( old vehicle ) डिझेलवरील वाहने आणि पंधरा वर्षांपेक्षा जुनी असलेली खाजगी वाहने रस्त्यावरून हटवली जाण्याचे आदेश दिले जाणार आहेत त्यामुळे अशी वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत . वीस वर्षांपेक्षा जुनी असलेली ५१ लाख हलकी वाहने आणि पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्षे जुनी असलेली ३४ लाख वाहने सद्या रस्त्यावर धावत आहेत . नवा कायदा येत असून या कायद्यानुसार जबर दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे .लगेच स्क्रॅप पंधरा ! वर्षांपेक्षा जुनी असणारी मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने जवळपास १७ लाख असून ही वाहने वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावत आहेत . दुचाकी वाहनांसाठी देखील हा कायदा असून फिटनेस प्रमाणपत्र मडगार्ड अथवा मास्क किंवा ऍप्रन अशा ठिकाणी असलेल्या रिकाम्या जागेत लावले जाणार आहे . हरियाणा आणि दिल्ल्ली सरकारने असा निर्णय आधीच दिलेला असून १ एप्रिलपासून हा नियम लागू केला जाणार आहे . हा नवा नियम लागू होताच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली जुनी वाहने रस्त्यावर आल्यास टी लगेच जप्त करण्यात येणार असून ती वाहन मालकास परत मिळणार .नाही . अशी वाहने थेट स्क्रॅप करण्यासाठी पाठवली जाणार आहेत त्यामुळे वाहन मालकांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे . या नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास आपले वाहन स्क्रॅप झालेले पाहण्याची वेळ येणार आहे .

0 Comments