मंगळवेढ्यात बिबट्याचा जर्सी गाईवर जीवघेणा हल्ला, जर्सी गाई मृत्यूमुखी
मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील रघुनाथ भिवा कांबळे या शेतकऱ्याच्या जर्सी गाईचा बिबट्या सदृश्य प्राण्याने फडशा पाडला आहे.
या जर्सी गाईचे पोट पूर्णपणे फाडून जीवघेणा हल्ला केला यामध्ये जर्सी गाई मरण पावली आहे. गायीवर हल्ला केल्यानंतर काही वेळातच खडकी येथील दोन मुलांना बिबट्या सदृश प्राणी दिसला असल्याचे या मुलांनी सांगितले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी साडे अकरा च्या दरम्यान रघुनाथ भिवा कांबळे यांनी आपली जर्सी गाई शेतामध्ये झाडाखाली बांधली होती.
पाहिले नंतर सदर गाई अर्धवट खाल्लेले अवस्थेमध्ये आढळून आली. आसपास चौकशी केली असता शेतकऱ्यांच्या मुलांनी बिबट्या सारखा प्राणी आम्ही पाहिला असे सांगितले. यानंतर खडकी येथीलच शेंबडे या शेतकऱ्याने रात्री साडेनऊ वाजता मला बिबट्या सदृश प्राणी दिसला असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील शेतकरी पूर्णपणे घाबरून गेलेला आहेत.त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या प्राण्याची ठसे तपासून घेणे गरजेचे झाले आहे.अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.


0 Comments