राज्यातील सर्वात मोठी बातमी : शिवसेना नेत्याची अकरा कोटीची संपत्ती जप्त !
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात ठाण्यातील काही जमिनींचा समावेश आहे.
सरनाईक आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन आठवड्यात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ईडीने यापूर्वीही एनएसीएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आज अचानक ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केल्याने या कारवाईने ठाण्यातही खळबळ उडाली आहे.
एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्याचा ईडीने प्रयत्न केला होता. मात्र, याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.त्यांची ठाण्यातील 11 कोटी 36 लाखाची संपत्ती जप्त केली आहे. यात ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची किंमत एवढी असल्याचं सांगितलं जात आहे.
सरनाईक यांची ईडीने आधी चौकशी केली होती. काही कागदपत्रंही तपासले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस नोंदवण्यात आली. त्यानंतर सरनाईक यांना वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र सरनाईक एकदा चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर आज थेट ईडीने कारवाी केली आहे.


0 Comments