google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय.

Breaking News

सोलापूर : हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय.

 सोलापूर : हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय.

सांगोला: विक्रमवीर स्वर्गीय गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निधनानंतर सांगोल्यातील शेकापच्या अस्तित्वाबद्दल व त्यांच्या वारसदाराबद्दल बरीच चर्चा होत होती. परंतु स्वर्गीय आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सध्या संपूर्णपणे पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी व समाजसेवेसाठी  वेळ घालवत आहे. सध्या तालुक्यात कोणतेही व कोणाचेही काम असो, सुख-दुःख असो किंवा एखाद्याचा वाढदिवस असला तरी डॉ. बाबासाहेब त्यांना फोन करतात. त्यांच्या फोन करण्यामुळे 'हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय..!' या वाक्याबद्दल तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.


राजकीय दृष्ट्या शेकाप म्हटलं की सांगोला तालुक्याचे नाव समोर येते. सांगोल्यातील शेकाप म्हटलं की विक्रमवीर स्वर्गीय गणपतराव देशमुख (आबा) यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यातील शेकाप पक्षाच्या अस्तित्वाबद्दल व त्यांच्या या पुढील राजकीय वारसदाराबद्दल तालुक्यात व जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरू होती. परंतु त्यांच्या निधनानंतर तालुक्यात पक्षाला, समाजकार्याला स्वर्गीय आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी संपूर्णपुणे वेळ देत आहेत.


कोरोना महामारीच्या संकट काळातही डॉ. बाबासाहेब देशमुख हे शिक्षणासाठी राज्याबाहेर असतानाही तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना फोनवरून सद्यस्थितीची माहिती घेत होते. कोरोनामळे कोण आजारी आहे, गावात कोविड रुग्ण किती आहेत, काय उपाय योजना केले आहेत याबद्दल ते सविस्तर माहिती घेत होते व नागरिकांना याबाबत फोनवरुन संदेशही देत होते. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ते सांगोल्यात स्थिरावले असून डॉक्टरकीपेक्षा पक्ष वाढीसाठी व गणपतराव देशमुख यांचे विचार पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. बाबासाहेब हे नाव माहीत नसतानाही प्रत्येक गाव प्रमुख व इतर सामान्य नाही फोन करून 'हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय..! असे म्हणून ते सर्वांशी विचारपूस करीत आहेत.


आबासाहेबांच्या निधनांतरचा पहिलाच यशस्वी मोर्चा -

स्वर्गीय आबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे जणसेवेच्या संघर्षासाठी तसेच मोर्चे, पाणी परिषदा, चळवळी घेण्यात गेले. त्यांच्या निधनानंतर सध्या विविध प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर शेकाप पक्षाने सोमवार (ता. 14) रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चाला तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला व नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या मेळाव्याच्या अगोदरही मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख हे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना स्वतः फोन करून मेळाव्याबाबत उपस्थित राहण्यासाठी व नियोजन करण्यासाठी फोन करीत होते. त्यामुळे गणपतरावांच्या निधनानंतर शेकाप पक्षाचे काय होईल असे म्हणणाऱ्यांना या मोर्चानेच उत्तर दिल्याचे दिसून येते.


'बाबासाहेब, तुम्हीच आमचे आबासाहेब' -

डॉ. बाबासाहेब देशमुख हे पक्षाच्या व इतर कार्यकर्त्यांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहताना दिसून येत आहेत. तसेच शेकाप पक्षानेही त्यांना पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष हे पद देऊन काम करण्याची संधी दिली आहे. सध्या तालुक्यांमध्ये त्यांची क्रेझ वाढताना दिसत येत असून सोशल मीडियावरही त्यांच्याबाबत अनेक कमेंटसही येत आहेत. 'बाबासाहेब, तुम्हीच आमचे आबासाहेब' अशापकारे विविध प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल सोशल मीडियावरुन दिल्या जात आहेत.


आबासाहेबांच्या वारसापेक्षा विचारांचा वारस हवा -

गणपतराव देशमुख (आबा) यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसाबद्दल बरीच चर्चा सगळीकडे सुरू होती. तसे ते उघडपणे दिसूनही येत होते. परंतु आबांचे कार्य हे अतिशय महान असून त्यांचा फक्त राजकीय वारस होण्यापेक्षा त्यांचे कार्य, आचार-विचार पुढे निघणारा वारसदारच हवा अशा प्रतिक्रिया जनसामान्यात बोलल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments