Breaking News

मरीन ड्राईव्हवर राडा : बार्शीच्या महिलांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला चोपले ...

 मरीन ड्राईव्हवर राडा : बार्शीच्या महिलांनी 

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला चोपले ...

सोलापूर : सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका महिलेस महिला दिनी फेसबुकवर अश्लील कमेंट करणं बार्शीच्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाला चांगलंच महागात पडलं आहे.तालुकाध्यक्ष जीवनदत्त अरगडे याने संजीवनी बारंगुळे या अपंग सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुकवर अश्लील भाषेत कॉमेंट केली होती. आरगडे मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बार्शीच्या महिलांनी त्यांना मरीन ड्राईव्हवर गाठून चोप दिला तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले.


कमेंटमध्ये बिंधास्त व्यक्त करा तुमची प्रतिक्रिया!यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बार्शी (सोलापूर) येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवनदत्त अरगडे यांनी संजीवनी बारंगुळे या अपंग सामाजिक कार्यकर्तीस महिला दिनी फेसबुकवर अश्लील भाषेत कॉमेंट केली होती. त्याविषयी आरगडे यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.बार्शी पोलिस आरगडेचा शोध घेत होते. दरम्यान, आरगडे हा मुंबईत असल्याची माहिती बारंगुळे यांना मिळाली. त्यामुळे बारंगुळे या स्वतः काही महिलांसोबत मुंबईत दाखल झाल्या. तसेच मरीन ड्राईव्हवर आरगडेला गाठून महिलांनी चांगलाच चोप दिला. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबतचे व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर फिरू लागले आहेत. त्यामुळे बार्शीच्या महिला काहीही करू शकतात, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.


दरम्यान जीवनदत्त आरगडे याने मुंबईतही या महिलांना शिवीगाळ केल्याने त्याच्यावर 354,323,104,506 या कलमान्वये मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस निरिक्षक सारिक गटकुळ यांनी सांगितले की, बार्शी येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांनी अपंग महिलेवर समाजमाध्यमातून अश्लिल भाषेत कॉमेंट केली होती. याबाबत सदर महिलेने बार्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments