पंढरपूर तालुक्यातील वीज तोडल्यामुळे
एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
विज कंपनीच्या थकित वसुलीला वैतागलेल्या ऐका तरूण शेतकर्याने पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको; व्हिडिओतून व्यथा मांडत त्या तरुणाने जीवन संपवलं!
पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या तरुणाने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर करून आपलं जीवन संपवलं.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुरज जाधव असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. सुरज जाधव हा पंढरपर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी आहे. 'पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको. शेतकरी नामर्द आहे. सरकारही शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही,' असं म्हणत सुरजने विष प्यायलं. याबाबतची माहिती सुरजच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं.
मात्र विषारी औषध प्राशन केल्याने सुरजची प्रकृती गंभीर होती. अखेर आज उपचारादरम्यान सुरजचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शेतीत सतत होणाऱ्या नुकसानीमुळे सुरज गेल्या काही दिवसांपासून तणावात होता असं सांगितलं जात आहे. याच नैराश्यातून अखेर त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटने

0 Comments