डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगली थिल्हाधिकारी कार्यालयावरती विवीध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चामध्ये पुढील मागण्याचा समावेश होता (१) वनजमीनीवरील रहिवाशी आतीक्रमण जागा नावावरती कराव्यात (२)प्रत्येक कुटुंबाला चार गुंठे जागा नावावरती करावी(३)म्हैसाळ योजनेसाठी जमीनी आधिग्रक्षण केली जात आहे तीला २०१३ भुमी अधिग्रहण कायद्यप्रमाणे मोबदला मिळावा आशा मागण्या करण्यात आल्या
मोर्चाला संबोधीत करताना डाँ बाबासाहेब देशमुख म्हणाले की वनजमीन गायरानामध्ये जे गरीब लोक वर्षानुवर्षे ३० ते ४० वर्षे रहात आहेत त्यामध्ये आल्पभुधारक,दलीत,श्रमीक,आशा लोकांचा समावेश आसुन.२०१८ शासन आदेशानुसार सदर जमीनीवरील अतीक्रमणे कायम करावीत जर का भविष्यकाळात आशा लोकांना न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर ऊतरुन आणखी तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल आसा ईशाराच त्यांनी दिला
सदर मोर्चामध्ये भाई शरद पाटील (जिल्हा चिटणीस)भाई दिगंबर कांबळे,भाई बाबुराव लगारे(मध्यवर्ती सदस्य),अजीत सुर्यवंशी(सांगली शहर चिटणीस)भानुदास सुर्यवंशी,ऊत्तम यादव(खानापुर चिटणिस)संजना पवार (महिला आघाडी शिरढोण)
ईत्यादी नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली मोर्चा मध्ये आनेक अल्पभुधारक शेतकरी,कष्टकरी,दलीत,कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत आसलेची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दीली


0 Comments