google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी सैनिकाचा मुलगा झाला फौजदार......

Breaking News

माजी सैनिकाचा मुलगा झाला फौजदार......

 
माजी सैनिकाचा मुलगा झाला फौजदार......


बागलवाडी ता.सांगोला गावचे सुपुत्र संतोष हणमंत चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.... संतोष संपूर्ण महाराष्ट्रातून 117 व्या क्रमांकने उत्तीर्ण झाला आहे...संतोष चे प्राथमिक शिक्षण उत्कर्ष प्राथमिक विद्यालय मधून झाले आहे.. व माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर सांगोला येथून पूर्ण झाले आहे... त्यानंतर संतोष ने राज्यशास्त्र हा विषय घेऊन पदवी आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथून 2014 ला पूर्ण केली आहे...



संतोष ची घरची परिस्थिती ऐकली तर कुणाच्या ही डोळ्यात पाणी येईल अशी आहे... संतोष चे वडील भारतीय आर्मी मध्ये सैनिक होते...परंतु संतोष ला वडिलांचा चेहरा सुद्धा पाहता आला नाहीं,संतोष 2 वर्षाचा असताना  वडिलांचे छत्र हरपले...वडील जम्मू काश्मीर मध्ये असताना अपघाती निधन झाले....तेव्हा पासून संतोष चा सांभाळ त्यांचं आईने केला...संतोष हा त्याचा आईला एकुलता एक


 मुलगा..वडिलांच्या मिळणाऱ्या पेन्शन वर त्या माऊलीने घर चालवलं .. व संतोष चे शिक्षण पूर्ण केलं...आपल्या मुलाला पोलिस अधिकारी बनवायचं हे ध्येय त्या माऊलीन पाहिलं.. आणि प्रत्यक्षात साकार ही केलं....

खरंतर संतोष ला बारावी नंतर इंजिनियरिंग ला प्रवेश मिळाला होता... पण आईच स्वप्न आपल्या मुलाला पोलिस अधिकारी बनवायचं असल्याने संतोष ने इंजिनिअरिंग ऐवजी BA ल प्रवेश घेतला.... BA पूर्ण झाल्या नंतर एमपीएससी च्या अभ्यासला सुरूवात केली..2017 ला सर्व टप्पे पूर्ण केले परंतु अंतिम निवड झाली


 नाही....2019 ला झालेल्या परीक्षेची मुलाखत v शारिरीक चाचणी तब्बल अडीच वर्षांनी झाली...त्यामुळे संतोष ल वारंवार दुखपतीला सामोरे जावे लागले....शारीरिक चाचणी त अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क आल्याने आपल काय होईल या विचाराने संतोष मुलाखती नंतर टेन्शन मध्ये असायचा...पण संतोष ला मुलाखतीला महाराष्ट्रातील टॉप चे गुण मिळाले व तो आज फौजदार झाला..


आज तो पोलिस उपनिरीक्षक झाला असला  राज्यसेवा तून पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी प्रयत्नशील आहे.....प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अस म्हणल जात..संतोष च या यशात त्याचा आईचे खूप मोठे योगदान आहे..त्याच बरोबर बहीण मनीषा व भाऊ सागर,राहुल व मित्र सत्यवान शिनगारे(PSI) रवी म्हमाने ,महेश जाधव, अजित पवार यांनी खूप साथ दिली आहे...


तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर घरची परिस्थिती आडवी येत नसते,उलट तीच परिस्थिती आपली प्रेरणा ठरते, हे संतोष ने दाखवून दिले आहे.. त्याचा या कष्टाला व आईच्या स्वप्नाला सलाम....🙏

Post a Comment

0 Comments