अशोक कामटे संघटनेच्यावतीने शहीद दिन साजरा.
सांगोला (प्रतिनिधी)सांगोला येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने शहीद दिन साजरा करण्यात आला . देशाचे महान महात्मे देशासाठी बलिदान दिलेले शहीद भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस सर्वत्र शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचाच भाग म्हणून सांगोल्यातील
सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन एडवोकेट हर्षवर्धन चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी शहिदांना फुले वाहून अभिवादन केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने करण्यात आली.


0 Comments