google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात 846 पोलीस उपनिरीक्षक झाले 'API' ; सोलापूरातून 19 जणांना प्रमोशन ; नव्याने येणार 5 'सपोनि'

Breaking News

राज्यात 846 पोलीस उपनिरीक्षक झाले 'API' ; सोलापूरातून 19 जणांना प्रमोशन ; नव्याने येणार 5 'सपोनि'

 राज्यात 846 पोलीस उपनिरीक्षक झाले 'API' ; सोलापूरातून 19 जणांना प्रमोशन ; नव्याने येणार 5 'सपोनि'

सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने 22 मार्च 2022 रोजी राज्यातील तब्बल 846 पोलीस उपनिरीक्षकांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती केल्याचे आदेश काढले. त्यामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील तब्बल 19 पोलिस उपनिरीक्षकांना प्रमोशन मिळाले असून या प्रमोशन नंतर त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून बदली झाली आहे. सोलापुरात नव्याने प्रमोशन होऊन पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक येत आहेत.


दिनांक ०७/०५/२०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोटयातील निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांची सर्व रिक्त पदे दिनांक २५/०५/२००४ च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येत असून, दिनांक २५/०५/२००४ नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या निःशस्त्र पोलीस उप निरीक्षकांना त्यांच्या मुळ सेवाज्येष्ठतेनुसार निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येत आहे. संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानुसार विभागीय पदोन्नती समितीने निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक यांना निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता तपासुन सन २०२०-२१ ची निवडसूची तयार केली आहे.


२. निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक ते निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी सन २०२०-२१ च्या निवडसुचीकरीता दिनांक ०९/०२/२०२२ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांपैकी ८४६ निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक १४/०७/२०२१ मधील नियमांप्रमाणे महसूल संवर्ग वाटप करण्यात आलेले आहेत.


■प्रमोशन होऊन जाणारे एपीआय पुढीलप्रमाणे

संदीप रंगराव शिंदे, किरण कारभारी भालेराव, विजय अब्बास वाघमारे, किरण चंद्रकांत स्वामी, केतन दत्तात्रय मांजरे, शैलेश रघुनाथ खेडकर, दत्तात्रय कोंडीबा वाघ, दीपक सुखदेव दळवी, रियाज मेहबूब मुजावर, महेश विठ्ठल मुंडे, सचिन नकुल व्हसमळे, अजय दत्तात्रय हंचाटे, आजिनाथ महारनवर, गणेश हिरासिंग पिंगूवाले, आनंद प्रकाश माळाळे, संतोष महादेव माने, राजप्पा बसप्पा चानकोटी, अमोल रवींद्र ननावरे, प्रेमकुमार भागवत केदार


■ प्रमोशन होऊन येणारे 5 एपीआय पुढीलप्रमाणे

रमेश अशोक कांबळे, विशाल महादेव दांडगे, तुकाराम चिंघु लांघी, विजय विश्‍वनाथ जाधव व  दत्‍तात्रय भिमराव काळे

Post a Comment

0 Comments