धक्कादायक बातमी... चिमुकल्या मुलाला तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेले !
जत : एका अपघातात अत्यंत क्रूर आणि निर्धी प्रकार समोर आला कारच्या बंपरमध्ये असून अडकलेल्या अवघ्या दोन वर्षाच्या बालकास तबब्ल सहा किलोमीटर फरफटत नेले गेले आणि या बालकाचा यात मृत्यू झाला . अलीकडे अपघात ही नित्याची बाब बनली असून निरपराध लोकांच्या जीवाला काहीच किंमत उरली नाही की काय ? असा प्रश्न रोज उभा राहतो .
कुणाच्या जीवाची कुणीच पर्वा करीत नाही , ज्याला त्याला फक्त प्रचंड घाई आहे आणि याच घाईत तो समोर येईल त्याला चिरडत धावताना दिसत आहे . आज तर अत्यंत थरारक , निर्दयी घटना समोरआली असून मानवता आता कुठे शिल्लक राहिली आहे की नाही ? या प्रश्नांचे उत्तर देखील मिळणे कठीण झाले आहे . एका कारने अपघात तर केलाच पण दोन वर्षाच्या बालकाच्या जीवाशी अत्यंत क्रूर खेळ खेळला गेला आहे .
कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धावडवाडी या गावातील एका कुटुंबाच्या बाबतीत अंत्यत दुःखदायक आणि विदारक घटना घडली आहे . साजिद लालखान शेख आणि त्यांची पत्नी जबीन हे दोघे आपल्या दोन वर्षे चिमुकल्या वयाच्या अब्दुल या मुलास घेवून शेतावर निघालेले होते .
ते शेताकडे जात असताना जांभूळवाडी फाट्याजवळ पोहोचले त्यांच्या गाडीला असताना पाठीमागून एका चार चाकी गाडीने जोरदार धडक दिली . या धडकेमुळे साजिद शेख हे उडून दूर अंतरावर जावून पडले .साजिद शेख हे उडून रस्त्यावर आपटले पण त्यांची पत्नी जबीन आणि दोन वर्षांचा मुलगा अब्दुल हे दोघेही या कारच्या बंपरमध्ये अडकले . तशा परिस्थिती देखील कार चालक थांबला नाही .
या माय लेकरांना फरफटत तसाच तो धावत राहिला . साधारण तीनशे फुट अंतरावर गेल्यावर जबीन या रस्त्यावर फेकल्या गेल्या पण दोन कार वर्षाचा अब्दुल तसाच बंपरमध्ये अडकलेला होता . एवढा भयानक प्रसंग घडत असतानाही चालकाला दया आली नाही की त्याने कार थांबवली देखील नाही . उलट अपघात घडल्यानंतर त्याने आणखी सुसाट वेगाने आपली कार दामटली .
जांभूळवाडी फाट्यापर्यंत फाट्यापासून नागज किलोमीटर अंतरापर्यंत सहा कारचालकाने जीवाला या लहानग्या बंपरला अडकलेल्या अवस्थेत फरफटत नेले . पुढे काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी आरडा ओरडा करीत त्याला गाडी थांबविण्यास सांगितले पण त्याने कुणाचेही न ऐकता गाडी तशीच पळवत राहिला . अखेर काही लोकांनी त्याचा पाठलाग सुरु केला .
आपला पाठलाग होतोय हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि बंपरमध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला कडून बाजूला फेकले आणि गाडी पुन्हा वेगाने दामटली . हा एकूण प्रकार अत्यंत थरारक आणि निर्दयी होता .गाडी बेफाम चालवत निघालेल्या या कारचालकास रोखण्यात अखेर काही लोकांना यश आले . त्याची गाडी थांबवून त्याला लोकांनी बेदम चोप दिला . चिमुकल्या अब्दुल यास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण या घटनेत त्याचा मृत्यू झाला होता .
पोलिसांनी महादेव मधुकर कुंडले या निर्दयी कारचालकास ताब्यात घेतले आहे . गाडीच्या बंपरमध्ये अडकलेल्या चिमुकल्या मुलाची देखील चालकास कशी दया आली नसेल ? असाच प्रश्न ज्याला त्याला पडलेला होता . अत्यंत थरारक आणि निर्दयीपणाचा कळस अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी पहिला आणि अनुभवला .
0 Comments