google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कार अपघातात 26 वर्षीय अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू

Breaking News

कार अपघातात 26 वर्षीय अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू

 कार अपघातात 26 वर्षीय अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू


घरी परतताना अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

। हैदराबाद । दि.21 मार्च ।  दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूझ चं शुक्रवारी एका भीषण कार अपघातात निधन झालं.


अभिनेत्री होळी पार्टी आटोपून घरी परतत होत्या. गायत्री फक्त २६ वर्षांची होती. 'मॅडम सर मॅडम अंते' या वेब सीरिजमुळे गायत्रीला बरीच प्रसिद्ध मिळाली होती. कार चालवत असताना डिव्हायडरवर गाडी आपटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाल्याचे समजते आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री गायत्रीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र राठोड जखमी अवस्थेत आढळून आला होता.


 त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याठिकाणीच त्याने अंतिम श्वास घेतला. या दोघांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचा मृत्यू तेलगू मनोरंजन इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे.  मीडिया अहवालानुसार, रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेला कारची धडक बसली होती. मात्र, कार उलटल्याने महिला त्याखाली दबली गेली आणि तिचाही जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments