google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळे येथील फॉरेस्ट पेटले, तीनशे एकराहून अधिक क्षेत्र जळाले

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळे येथील फॉरेस्ट पेटले, तीनशे एकराहून अधिक क्षेत्र जळाले

 सांगोला तालुक्यातील कोळे येथील फॉरेस्ट पेटले, तीनशे एकराहून अधिक क्षेत्र जळाले 

आजच्या या आगीमुळे फक्त झाडेच जाळली नसून वनातील प्राणी,पक्षी यांनाही इजा पोहचली असणार. त्यातच कडक ऊन त्यामुळे झाडे, गवत व अन्य असे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.सांगोला तालुक्यात वनपरिक्षेत्र विभागाला कोणी वालीच नाही. जे अधिकारी आहेत ते ठेकेदार झाले आहेत. वनसंपदा जोपासण्यात ते कमी पडताना दिसत आहेत. मंगळवार 22 मार्च रोजी कोळ्यातील येसनखडीचा डोंगर पेटल्याने वनविभागाचे तीनशे एकर क्षेत्र जाळून खाक झाले.


सांगोला तालुक्यात झाडे जाळण्यास, झाडांची तोड करण्यास वनविभाग रोखू शकत नाही अशी स्थिती आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यापासून ते वनमजूर कोणीच कामावर सापडत नाहीत. आज येथे केवळ कंत्राटी वनमजूरच कामावर पहावयास मिळतात. सद्या मार्च एंड असल्याने, वनपालापासून ते वनरक्षक ठेकेदाराच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे या वनांना कोणीच वाली नाही. अशातच या प्रकारामुळे कोळा येथील येसनखडीवरील तीनशे एकर क्षेत्र जळाले आहे.


गावाच्या दक्षिणेला कोंबडवाडी ते तिप्पेहळी रोडलगत वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यातच मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास याच डोंगराला आग लागल्याने यातील एक व दोन वर्षांपूर्वी लागण केलेल्या तसेच अन्य झाडांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


यावेळी गावातील संतोषभाऊ करांडे युवा मंच सर्व कार्यकर्ते, वन विभागाचे काही कर्मचारी यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीने प्रयत्न करीत होते. पण आधीच कडक ऊन त्यामुळे संपूर्ण फॉरेस्ट जाळून खाक झाले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता.


आग लागली का लावली?

कोळा येथील येसनखडीवरील वनविभागाचे तीनशे एकर क्षेत्र जळाले. यामध्ये मोठे नुकसान झाले. पण वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याचे फोन बंद होते. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली त्यावेळी वनपाल, वनरक्षक कोठे होते? वनमजूर काय करीत होते? तालुक्यात सध्या याच वणांना कोणी वालीच नाही. त्यामुळे आग लागली की लावली? हे मात्र समजू शकले नाही.


झाडे गवतही जळाले

आजच्या या आगीमुळे फक्त झाडेच जाळली नसून वनातील प्राणी,पक्षी यांनाही इजा पोहचली असणार. त्यातच कडक ऊन त्यामुळे झाडे, गवत व अन्य असे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments