सोलापूरच्या भावांनो रंगपंचमीत प्या आता केवळ 'भंग' ; जिल्हा प्रशासनाने घेतला हा निर्णय
सोलापूर, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमीचा उत्सव साजरा होत आहे.
सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने रंगपंचमी दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
रंगपंचमी दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, ताडी दुकाने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियममधील कलम 142 (1) अन्वये पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
0 Comments