Breaking News

स्वतःहाच्या पत्नीची पतीने तिच्याच प्रियकरासोबत मिळून केली हत्या, दोघेही फरार….

 स्वतःहाच्या पत्नीची पतीने तिच्याच प्रियकरासोबत मिळून केली हत्या, दोघेही फरार….

 घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले…


छत्तीसगढच्या दुर्ग पोलिसांनी पूजा मर्डर प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, महिलेची हत्या तिचा दुसरा पती आणि तिच्या प्रियकराने मिळून केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटकही केली आहे. आरोपी महिलेचा दुसरा पती आहे. घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.


उतई पोलिसांच्या माहितीनुसार , ३५ वर्षीय पूजा निर्मलकरची हत्या गेल्या २३ फेब्रुवारीला झाली होती. पोलिसांनी दावा केला की, पूजाची हत्या तिचा दुसरा पती अविनाश आणि प्रियकर राजू यांनी मिळून पुजाची हत्या केली. पोलिसांनुसार, डान्स दरम्यान पूजा प्रियकर राजूसोबत अश्लील चाळे करू लागली होती. पत्नी आणि तिचा प्रियकर राजूचं हे वागणं पाहून महिलेचा पती अविनाश रूममधून बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला तर पूजा आणि राजू त्याचा आक्षेपार्ह स्थितीत दिसले. जे पाहून तो संतापला. त्याने पूजा आणि राजूला मारहाण सुरू केली. पूजाला जास्त लागलं आणि राजुने तेथून पळ काढला.


पोलिसां च्या माहीतीनुसार, पूजाला जास्त मार लागला होता. ते पाहून अविनाशने राजूला पुन्हा बोलवलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. दोघांनी चर्चा केली. हॉस्पिटलमध्ये नेलं तर पोलीस केस होईल असं त्यांचं मत झालं. त्यानंतर दोघे आपसात बोलला मग राजू आणि अविनाशने पूजाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या करून फरार झाले. पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments