google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

Breaking News

प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

 प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. पण यात मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश महत्वाचा होता की विभागीय आयुक्तांचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


अन्यायकारक बदली केल्याबद्दल १९ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचा हा आदेश रद्द केला होता.


हा आदेश रद्द करताना शिक्षकांच्या बदल्या कराव्यात असे आदेशात कुठेच नमूद नसताना २८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडून आलेले १९ व उच्च न्यायालयातून आदेश आणलेल्या ५३ शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले. पण यातील १९ शिक्षकांना २४ फेब्रुवारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणाचे आदेश देण्यात आले आहेत. पण उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये करावयाच्या नियुक्त्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.


याबाबत सीईओंनी सभपतीची तक्रार असल्याचे तोंडी सांगितले आहे. मात्र रेकॉर्डवर एका शिक्षकाने आक्षेप घेतल्याने काम थांबल्याचे सांगितले जात आहे. पण प्रशासनाने पदस्थापना देण्याबाबत चुकीची पद्धत अवलंबल्याचा आरोप शिक्षकांमधून होत आहे.


बुधवारी शिक्षक संघटनाचे अनेक प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आले होते. त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 53 शिक्षकांची जबाबदारी सुद्धा शिक्षण विभागातील त्या 'पुष्पा' ने घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो शिक्षणचा कर्मचारी कोण हे आता जवळपास सर्वाना माहिती झाले आहे.


या शिक्षकांना दिली बदली

नवीन पदस्थापना झालेले शिक्षक पुढीलप्रमाणे असून, कंसात जुन्या नियुक्तीचे ठिकाण आहे.

शिवप्पा जमादार : कुसूर (गौडगाव बु.), हेमा शिंदे : हत्तूर (नराळे), प्रदीपकुमार पाटील : तेलगाव, उत्तर सोलापूर (ममदाबाद हुन्नूर), मेनका हजारे : गैरहजर (कातेवाडी), उदय झोळ : सोमेश्वरनगर, दक्षिण सोलापूर (शिंगलानगर, पंढरपूर), चिन्नय्या स्वामी : सोमेश्वरनगर (लोणार), विकास पवार : अमृतनगर, दक्षिण सोलापूर (लोणार), बक्तावर मोगल (दामलेवस्ती (पाचेगाव खु.), सुप्रिया महाजन : मंद्रुप (काचेकाबुगडे वस्ती, सांगोला), 


अश्विनी जमदाडे : वाखरी (इरकल वस्ती, माळशिरस), सचिन मोरे : पाकणी (कोळसे वस्ती), अर्जुन चव्हाण : चोपडी (चौगुले मळा), स्वाती मेंडगुदले : देवळे (हंबीशेवाडी), सादिक मुजावर : बक्षीहिप्परगा (गुजलेवस्ती, सांगोला), कमल अणची : नाईकनगर, दक्षिण सोलापूर (किडबिसरी, सांगोला), सादिया दंडाेती : विडी घरकुल ब (वागदरी), शबाना शेख : इंदिरानगर, मंद्रुप (किडबिसरी), फरहीन पठाण : विडी घरकुल अ (करकंब).

Post a Comment

0 Comments